विदर्भ ट्रॅव्हल्स बस चा भीषण अपघात : 25 प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू

बस खांबाला भिडून दुभाजकावर आदळून पलटी झाली आणि पेट घेतला
सरकार कडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत
बुलढाणा / नवप्रहार न्यूज नेटवर्क
नागपूर वरून पुण्याकडे जाण्यासाठी निघालेल्या बस चा सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याने आणि पलटी झालेल्या ट्रॅव्हल्स ने पेट घेतल्याने बस मधील 25 प्रवाश्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.यात लहान मुलांचा समावेश आहे. ट्रॅव्हल्स मध्ये ऐकून 33 प्रवाशी होते. मृतददेहांची ओळख पटवणे कठीण होऊन बसले आहे. ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट करावी लागणार असे पोलिसांचे म्हणणे आहे.
. ही बस नागपूरहून निघाल्यामुळे खाजगी बस बुकिंग पॉईंट वरून ऑफिस मधून मृतांची नावं मिळण्यासाठी पोलीस यंत्रणा व प्रशासन प्रयत्न करत आहे आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती.
नेमका अपघात कसा घडला
प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. खांबाला धडकून उजव्या बाजूच्या संरक्षक कठड्यावर आदळलेली बस आधी डावीकडे पलटी झाली, नंतर काही क्षणातच तिने पेट घेतला. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.
या अपघातात वाचलेल्या तरुणांनी सांगितला घटनाक्रम – या अपघातात वाचलेल्या तरुणांनी घटनाक्रम सांगितला आहे. या ट्रॅव्हल्स मध्ये 19 आणि 20 क्रमांकाच्या आसन व्यवस्थेवर बसलेल्या तरुणा नुसार नागपूरहून औरंगाबादकडे निघालेल्या या ट्रॅव्हल्स मध्ये आम्ही रात्री जेवण करुन बसमध्ये बसलो होतो. त्यानंतर साधारण अर्ध्या तासानं बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर ही बस पलटी झाली. पलटी झाल्यानंतर लगेच बसने पेट घेतल्याची माहिती बसमधील प्रवाशांनी दिली. आम्ही 19 आणि 20 नंबरच्या सीटवर बसलो होतो. बस पलटी झाल्यानंतर आम्ही खाली पडलो, त्यानंतर आम्ही बसची वरची खिडकी तोडली आणि त्यातून बाहेर पडल्याचे प्रवाशांनी सांगितले.
बुकिंग पॉईंट वरून घ्यावी लागेल मदत – . ही बस नागपूरहून निघाल्यामुळे खाजगी बस बुकिंग पॉईंट वरून ऑफिस मधून मृतांची नावं मिळण्यासाठी पोलीस यंत्रणा व प्रशासन प्रयत्न करत आहे आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती.