लाखांदूर येथे मिनीट्रकसह ३१ लाख ६५ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू. जप्त
भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..
मोठ्या किराणा व्यवसायीकासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल..
नव प्रहार/राजू आगलावे(जि.प्र).
भंडारा:-भंडारा जिल्ह्याच्या तालुका दर्जा असलेल्या लाखांदुर येथे अनेक वर्षापासून शहरातील किराणा दुकानांधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा विक्री होत असल्याने लाखांदुर शहर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा विक्रीचे प्रमुख केंद्र बनले असल्याचा प्रकार समोर आला आहे.
प्राप्त माहीतीनुसार भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोमवारी २६ जुन २०२३ रोजी लाखांदुर तालुक्यात गस्तीवर असतांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे चिचगाव फाटा येथे वाहतूकी दरम्यान MH36/AA-0554 या क्रमांकाच्या मिनी ट्रकची तपासणी केली असता, त्यात चौकशी दरम्यान प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आल्याने, कारवाई करुन वाहनासह एकुण ३१ लाख ६५ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.
या कारवाईत एका मोठ्या किराणा व्यवसायीकासह अन्य तिन अशा एकुण ४ जणांविरुद्ध लाखांदुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन, आशिष सदाराम माकडे ,शंतनू सुरेश प्रधान, केवळराम नागवानी तिन्ही रा. लाखांदूर व संकेत रिचा, रा राजनांदगाव (म.प्र) अशी चार आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहा.पोलिस निरिक्षक तुरकुंडे, पोलिस हवालदार रोशन गजभिये, मोहरकर, पोलिस नायक प्रफुल कठाने,श्रीकांत मस्के आदींनी केली असुन, आरोंपिविरुद्ध कलम 272, 273, 328 34 भादवि सहकलम 59 अन्नसुरक्षा मानके कायद्यान्वये लाखांदूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणार्थ अन्न व औषध प्रशासनाकडून कडक कारवाई करणे सुरू केले आहे हे विशेष.