जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मोर्शी येथे जनजागृती रॅलीचे आयोजन
पोलीस व एनसीसी विभागाचा पुढाकार
मोर्शी(तालुका प्रतिनिधी)दि.२७/६
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य मोर्शी येथे पोलीस विभाग व 8 महाराष्ट्र एनसीसी बटालियन अमरावती यांचेशी संलग्नित असलेल्या स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी येथील एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्शी शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीचा समारोप मोर्शी पोलिस स्टेशन येथे करण्यात आले.याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे तर प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक प्रसाद देशमुख एनसीसी ऑफिसर श्रीकांत देशमुख,प्रवीण वेरूळक,संजय ठाकरे,योगेश सांभारे,मनोज गायकी,सचिन भाकरे,सुभाष वाघमारे उपस्थित होते.
अमली पदार्थ सेवनाने युवा पिढीवर होणारे दुष्परिणाम व बिघडणारे सामाजिक स्वास्थ या विषयावर पोलिस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांनी तर 26 जून हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून का साजरा केल्या जातो याबाबत एनसीसी ऑफिसर श्रीकांत देशमुख यांनी एनसीसी कॅडेट्सना संबोधित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल धुडे प्रास्ताविक बंटी नागले तर आभार शुभम इंगळे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पार्थ केचे,सर्वेश लुंगे,ध्रुव पांडे,धैर्य खडसे यांच्यासह मोर्शी पोलीस स्टेशन येथील कर्मचारी व शिवाजी उच्च माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.