पाथरगाव उपसा सिंचन योजने करिता सौर ऊर्जा प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता.
आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नांना आले मोठे यश.
पाथरगाव सिंचन योजनेच्या माध्यमातून हजार हेक्टर पेक्षाही जास्त जमिनीचा पाणी प्रश्न अखेर मार्गी लागलार.
चांदुर रेल्वे / प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस, जलसंपदा मंत्री माननीय श्री.गिरीशजी महाजन यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सौर ऊर्जा प्रस्तावास VIDC नियामक मंडळात मान्यता दिली आहे. ज्यामध्ये चांदुर रेल्वे तालुक्यातील बहुचर्चित पाथरगाव सिंचन योजनेचा समावेश आमदार प्रतापदादा अडसड यांच्या पाठपुराव्यानंतर करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची 83 वी बैठक सह्याद्री येथील अतिथिगृह येथे संपन्न झाली विदर्भातील रुपये 4199.72 कोटींच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ज्यामध्ये पाथरगाव उपसा सिंचन योजना समाविष्ट करण्यात आलेली आहे धामणगाव रेल्वे मतदार संघासाठी व विशेषतः चांदुर रेल्वे तालुक्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा समजला जात असून आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनींना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.*