हटके

आठ कोटींची लूट करणाऱ्या हसीनाला पोलिसांनी 10 रु च्या फ्रुटीत केले जेरबंद

Spread the love

लुधियाना / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

             आरोपी स्वतःला कितीही हुशार समजत असला तरी तो काही ना काही चूक करतो आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकतो. पोलीस अधिकारी आरोपीं साठी असा ट्रॅप लावतात की आरोपी अलगद त्यांच्या जाळ्यात अडकतो. या प्रकरणात देखील तसेच झाले आहे. 10 जून रोजी सिएसएम सिक्युरिटी व्हॅन मधील 8 कोटी 49 लाख रुपये आरोपींनी पळविले होते. यातील 5 आरोपींना पोलिसांनी पहिलेच अटक केली होती. तर हसीना  मनदीप कौर आणि तिचा पती फरार झाले होते. 

पोलिसांनी असे ओढले जाळ्यात – 

मास्टरमाइंड हसिना मनदीप कौर पोलिसांच्या हाती लागत नव्हती. ती आणि तिचा पती हेमकुंड साहिब येथे प्रार्थना करण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस तेथे पोहोचले, मात्र गर्दीच्या वेळी दोघांनाही अटक करणे पोलिसांसमोरही मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी एक मास्टर प्लॅन बनवला. पोलिसांनी धार्मिक स्थळाबाहेर उभारून फ्रुटीचे वाटप सुरू केले. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, मानवतेचा मुद्दा म्हणून पोलिसांनी दोघांनाही नतमस्तक होण्याची संधी दिली. यानंतर दोघेही फ्रुटी घेण्यासाठी रांगेत उभे राहिले. मोना आणि तिचा पती फ्रुटी घेण्यासाठी पोलिसांकडे येताच पोलिसांनी त्यांना अटक केली

10 जूनच्या रात्री काही लोकांनी सीएमएस सिक्युरिटीजची कॅश व्हॅन चोरली होती. या व्हॅनमध्ये 8 कोटी 49 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. ही व्हॅन जप्त केली असता, त्यात पोलिसांना शस्त्रे आणि पिस्तूलही सापडले. यानंतर पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. मोबाईल आणि टॉवरच्या तपशिलावरून पोलिसांनी लीड मिळवून ५ जणांना अटक केली. यावेळी पोलिसांनी ५ कोटी रुपये जप्त केले. मात्र, सूत्रधार मोना आणि तिचा पती अद्याप फरार होते. या प्रकरणातील आणखी काही जण अद्याप फरार असून, त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close