अंजनगाव सुर्जी कृषी कार्यालयाला कायमस्वरुपी कृषी अधिकारी द्या
विधानसभा प्रमुख युवासेना युवती सौ प्रांजली कैलास कुलट यांची जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी यांना निवेदनात मागणी
अंजनगाव सुर्जी — प्रतीनीधी —
अंजनगाव सुर्जी तालुका हा बागायतदार शेतकरी यांचा तालुका आहे. बारा महीने येथे
शेतकरी हा आपल्या शेतामध्ये पीक पिकवत असतो. सध्या मान्सुनचा काळा असुन सर्वशेतकरी हे आपल्या शेती पेरणीसाठी पाऊसाची वाट पाहत आहे. अंजनगाव सुजी
तालुक्यामध्ये एकुण 44 हजार हेक्टर शेती पेरणी योग्य असून त्यातील 13 ते 14 हजारहेक्टर क्षेत्र हे ओलीताखाली आहे. त्यामुळे शेतकरी विविध योजनासाठी कृषी कार्यालयात
माहीती घेण्यासाठी जात असतात. परंतू तालुका कृषी कार्यालयात कायम कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांची कायम स्वरुपी नियुक्त पद नाही आहे. त्यामुळे आपल्या
तक्रारी कोणाकडे मांडावे याबाबत अनभिज्ञ आहेत. मुख्य अधिकारी कायम स्वरुप कार्यरतनसल्यामुळे कार्यालयीन कर्मचारी हे सुध्दा कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे शेतकरीबांधव यांना रिकाम्या खुर्च्याचे दर्शन घेवुन वापस यावे लागत आहे.
सध्या कपाशी बियाणे संदर्भात खुप मोठी शेतकरी बांधवाची ओरड सुरु आहे. अजीत कंपनीच्या बियाणाचा
तुडवटा खुप मोठया प्रमाणात आहे. त्या समस्याचे गा-हाणे कोणाकडे मांडावे हा अक्ष प्रश्न शेतकरी बांधवासमोर उभा ढाकला आहे. कृषी अधिकारी यांचा प्रभारी कार्यभार दर्यापुर
तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याकडे सोपविला आहे ते आठवडयातील फक्त मंगळवारया दिवशी अंजनगाव सुजी तालुक्यात उपस्थित राहतात. असे निर्देशनात आले आहे.करीता आपण अंजनगाव सुर्जी कृषी अधिक्षक कार्यालय येथे कायम स्वरुपी कृषी अधिकारी यांची नियुक्ती करावी. जेणे करुन शेतकरी बांधव यांना आपले तक्रारी
मांडण्याकरीता सोयीचे होईल. आपण मान्सुन सुरु होण्यापूर्वी करावे. असे न झाल्यास।युवासेना युवती मार्फेत तालुक्यातील शेतक-यांना एकत्रित करुन खुप मोठे जन आंदोलन
उभारण्यात येईल. होणा-या जन आंदोलनास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंदघ्यावी.असे प्रकारचे आपल्या निवेदनात म्हटले आहे.
अंजनगाव सुर्जी तालुका बागायतीतदार शेतकरी असलेला तालुका आहे.त्यामुळे कृषी कार्यालय येथे कायम स्वरुपी कृषी अधिकारी असणे गरजेचे आहे. जिल्हात कृषी अधिकारी पदे मान्य व त्यापेक्षा कार्यरत कमी आहेत. तरीही विस्तार अधिकारी कृषी किंवा त्या रेंजचा अधिकारी यांची प्रभारी नियुक्ती करा.*
सौ प्रांजली कैलास कुलट
कृषी अधिकारी मान्य पद व कार्यरत पद यामध्ये खुप तफावत आहे. एकुण १४ कृषी अधिकारी यांची गरज असतांना ६ कृषी अधिकारी कार्यरत आहे. शासन दरबारी याबाबत पाठपुरावा सुरु आहे.*
राहुल सातपुते
जिल्हा कृषी अधिकारी
जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय अमरावती.