हटके

दुर्दैवी पित्याला पिशवीत टाकून 150 किमी न्यावा लागला नवजात बाळाचा मृतदेह

Spread the love

रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका देण्यास दिला नकार

डिंडोरी / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                     या आपाधापीच्या जीवनात मनुष्य स्वार्थी होत चालला आहे. त्याला स्वहित आणि पैश्या शिवाय दुसरे काही दिसत नाही.पूर्वी वेटाळात एखाद्याच्या घरी मृत्यू झाला तर  तेथील संपूर्ण लोकांना याचे दुःख होत होते पण वर्तमान स्थितीत कोणा सोबत काय होत आहे याचे शेजाऱ्यांना काही घेणेदेणे नसते. माणुसकी लोप पावत असल्याची अशीच एक घटना डिंडोरी जिल्ह्यात घडली आहे. रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका उपलब्ध न करून दिल्याने एका दुर्दैवी बापावर आपल्या नवजात बाळाचा मृतदेह पिशवीत टाकून 150 किमी नेण्याची वेळ ओढवली.

 उपलब्ध माहिती नुसार डिंडोरी जिल्ह्यातील सहजपुरी गावात राहणाऱ्या जमनीबाई यांना 13 जून रोजी प्रसूती वेदना होत असल्याने डिंडोरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रसूतीनंतर नवजात बालकाची प्रकृती ढासळू लागली. त्यामुळे त्याला जबलपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान दोन दिवसांनी 15 जून रोजी नवजात बालकाचा मृत्यू झाला.

पिशवीत गुंडाळला नवजात बालकाचा मृतदेह चिमुकल्याचा मृत्यू आणि पत्नी नुकतीच प्रसूत झाल्याने कुटुंबीयांनी डिडोरी येथे परतण्यासाठी रुग्णवाहिकेची मागणी केली. कुटुंबीयांनी मेडिकल कॉलेज जबलपूर व्यवस्थापनाकडे शववाहिनीची व्यवस्था करण्यासाठी खूप विनवणी केली.

मात्र, व्यवस्थापनाला पाझर फुटला नाही. वैद्यकीय महाविद्यालयातून नवजात अर्भकाचा मृतदेह एका ऑटोमध्ये ठेवून कुटुंबीयांनी कसातरी जबलपूर बसस्थानक गाठले. पण तरीही डिंडोरीपर्यंत दीडशे किमीचा प्रवास बाकी होता.

  या  कारणाने मृतदेह पिशवीत लपवून ठेवला – नवजात बालकाचा मृत्यू, नुकतीच प्रसूत झालेली पत्नी आणि त्यात कडक उष्णता. या सर्व प्रकाराने असहाय्य पित्याने मुलाचा मृतदेह एका पिशवीत ठेवला. कारण दुसरा उपाय नव्हता. मृतदेह पिशवीत लपवून बसमध्ये 150 किलोमीटरचा प्रवास करून रात्री उशिरा डिंडोरी गाठले. मृतदेह पिशवीत ठेवण्याचं कारण विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, मृतदेह पाहून बसचालकाने बसमध्ये बसण्यास नकार दिला. खासगी टॅक्सी भाड्याने घेण्याइतके पैसेही त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे त्यांनी मृतदेह एका पिशवीत लपवून कसातरी बसमध्ये बसवून डिंडोरी गाठले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close