यालाच म्हणतात नशीब फुटणे ! आणखी काय ?
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑशेस सीरीज सुरु आहे. 5 कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात क्रिकेट च्या ईतीहासातील विचित्र कही घटना घडली आहे. इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक ज्या पद्धतीने बाद झाला त्याला फुटक नशीबच म्हणावं लागेल. .
इंग्लंडने बॅझबॉल शैलीत धडाकेबाज सुरुवात केली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतर 176 धावांत त्यांचे 5 विकेट बाद झाले. कांगारूंनी पुन्हा गोलंदाजीची धार दाखवून दिली आणि इंग्लंड्च्या फलंदाजांची वाताहात झाल्याचं दिसून आलं. 32 धावा करून खेळणारा हॅरी ब्रूक अशाप्रकारे बाद झाला की विश्वास बसणं कठीण झालंय. त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं दिसतंय.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही अॅशेस मालिका केवळ या दोन देशांमध्येच नाही, तर जगभरात पाहिली जाते. पहिल्या सामन्यात एकीकडे बोलँड आणि हेझलवूड हे घातक गोलंदाजी करत असताना कॅप्टन कमिन्सने फिरकीचा मारा सुरू केला. नेथन लायन पहिल्या दिवशी पाटा पीचवर गोलंदाजी करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र, लायनने ऑली पोप (Ollie Pope) आणि हॅरी ब्रुकला तंबुत पाठवलं. त्यामुळे पहिल्या दिवशी कांगारूंचं पारडं जड झाल्याचं दिसतंय. या सामन्यात सर्वात चकित करणारी विकेट होती ती हॅरी ब्रुक याची.
सामन्याची 38 वी ओव्हर घेऊन नेथन लायन गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी हॅरी ब्रुक सेट झाला होता. 32 धावा काढून तो मैदानात पाय रोऊन उभा होता. त्यावेळी दुसऱ्या चेंडूवर ब्रूकने लेगस्टंपवर वळणारा चेंडू टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र, बॉल त्याच्या मांडीला लागून बॉल उसळला. उडालेला बॉल पकडण्यासाठी अॅलेक्स कॅरीने नजरा जमवल्या. मात्र घडलं भलतंच…
दरम्यान, अपेक्षित कॅरीपासून खूप दूर असलेला बॉल स्टंप्सच्या बाजूला पडला आणि बॉल विकेटवर लागला. ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली अन् ऑस्ट्रेलियाला फारसे कष्ट न घेता मोठी विकेट मिळाली. इंग्लंडने पहिल्या दिवशी 298 धावा केल्या असून मोईन अली आणि जो रूट (Joe Root) खेळत आहेत. नेथन लायनने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट पटकावल्या आहेत.