सामाजिक

तुमसर व मोहाडी येथे सर्पदंश, काळजी व उपाययोजना विषयावर आशांची कार्यशाळा

Spread the love

भंडारा /जि.प्र.
देशात, राज्यात तसेच जिल्हयात सर्पदंशाने होणाऱ्या मृत्युच्या घटनांची नोंद घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, भंडारा व स्नेकबाईट हिलींग ॲन्ड एज्युकेशन सोसायटी मुंबई यांचे समन्वयाने तालुका तुमसर व मोहाडी येथे सर्पदंश, काळजी व उपाययोजना या विषयी दिनांक 13 व 14 जुन 2023 रोजी आशा स्वंयसेविका यांचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेत डॉ.प्रियंका कदम, संस्थापक, स्नेकबाईट हिलींग ॲन्ड एज्युकेशन सोसायटी मुंबई यांनी सर्पदंश, काळजी व उपाययोजना या विषयी मार्गदर्शन केले.
*सर्पदंश कसे टाळावे :-*
1) बाहेर जातांना बुटांचा वापर करणे. 2) रात्रीच्यावेळी टॉर्चचा वापर करणे. 3) खाली जमीनीवर झोपणे टाळणे व मच्छरदानीचा वापर करणे. 4) घर आणि आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवणे व उंदरांची संख्या नियंत्रित ठेवणे.
*सर्पदंशावर उपाय :-*
1) सर्पदंश झाल्यास 104, 108, 112 या क्रमांकावर कॉल करुन गाडीची व्यवस्था करणे. 2) सर्पदंश झालेल्या व्यक्तीस हालचाल करु देऊ नये, पट्टा, दागिने, कडे, अंगडी, घडयाळ इत्यादी वस्तु काढून टाकाव्यात कारण दंश झालेल्या जागेवर सुज येऊ शकते. 3) रुग्ण वाहिका येण्यास वेळ लागणार असल्यास मिळेल त्या वाहनाने रुग्णास जवळच्या रुग्णालयात पोहचवीणे. 4) रुग्णास रुग्लालयात नेतांना डाव्या कुशीवर झोपवून त्याचा उजवापाय दुमडून अजवाहात चेहऱ्याखाली ठेवावा. स्वास निट घेता येईल व ओकारी झाल्यास श्वसन नलिका बंद होणार नाही. 5) दंशा बद्वलची सर्व माहिती डॉक्टरांना दया, सर्पदंशावर प्रतीसर्पविष हा एकमेव इलाज आहे.
*हे करु नका :-*
1) सर्पदंश झाल्यावर घाबरु नये, त्यावर इलाज उपलब्ध आहे.2) तंत्रमंत्राने विष उतरत नाही, कुठल्याही तांत्रीक किंवा मांत्रिकाच्या नांदी लागु नये, त्यांचेवर विश्वास ठेऊ नये. 3) साप चावलेल्या जागेवर चिरा मारु नये तसेच तोंडाने विष ओढण्याचा प्रत्यन करुन नये. 4) आवळपट्टी बांधू नये, दंश झालेल्या जागी बर्फ लाऊ नये, मालीश करु नये.5) स्वत: उपचार करु नये, तसेच कुठल्याही वनस्पती, मसाले इ. वापरु नये.
सर्पदंश कार्यशाळेत आशा योजनेअंतर्गत सर्पदेश योजनेवर मोबदल्याची तरतूद नसुन सामाजिक व रुगणसेवा या भावनेतुन समाजात सर्पदंशाबाबत जनजागृती करुन सर्पदंशामुळे होणारे मृत्यु टाळण्यात आपले महत्वपूर्ण योगदान दयावे, तसेच शासनस्तरावरुन सर्पदंशाबाबत मोबदला मिळण्याकरीता पाठपूरावा करण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर यांनी मार्गदर्शन करता व्यक्त केले.
कार्यशाळेत साथरोग वैद्यकिय अधिकारी डॉ.श्रीकांत आंबेकर, तालुका आरोग्य अधिकारी तुमसर डॉ.मेहबुब कुरैशी, तालुका आरोग्य अधिकारी मोहाडी डॉ.हिमांशु मते, जिल्हा समुह संघटक चंदू बारई, सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्रीमती सरिता निर्वाण, तालुक्यातील गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या, सदर कार्यशाळेचे प्रास्तावीक डॉ.श्रीकांत आंबेकर तर आभार चंदू बारई यांनी मानले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close