मोदींनी मागील 9 वर्षात अशक्य गोष्टी सहज शक्य करून दाखवल्या
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मागील ९ वर्षाच्या कार्यकाळात कल्पनेच्या पलीकडील अशक्य अशी हजारो कामे शक्य करून दाखवली देशातच नव्हे तर विदेशातही भारताचे नाव लौकिक केले विकसित देश सुद्धा भारताकडे विशेष आणि आश्चर्याच्या व अपेक्षेच्या, सन्मानाने व प्रतिष्ठेच्या नजरेने पाहत आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी म्हणजे यशस्वी आणि भारताचे नाव सर्व जगात लौकिक करणारे पंतप्रधान असल्याचे त्यांच्या कार्यातून वाणीतून व वागण्यातून दिसतच, कळतच असे आमदार प्रताप अडसड यांनी येथे पत्रकार परिषद मध्ये माहिती देताना सांगितले
आमदार अडसड यांनी जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या मागील नऊ वर्षाच्या कार्य काळातील काही विकासात्मक ठळक मुद्दे सुद्धा पत्रकारांसमक्ष उपस्थित केलेत ते म्हणाले की सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मोदी सरकारने ३७० कलम अयोध्या श्री राम मंदिर निर्माण दर्जेदार व नभूतो असे हायवे,समृद्धी निर्माण पर्यटन व्यापारामध्ये भरीव कामगिरी वैद्यकीय सुविधा तसेच गोरगरीब जनतेला कोट्यावधीच्या संख्येत निवास करोडो शौचालय निर्मिती करण्यात आल्या रोगराई निर्मूलनाचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले सिंचन अनुशेष पूर्ण करण्यात आला आरोग्य सुविधांमध्ये भारत उच्च स्थानावर आहे याचे श्रेय सुद्धा मोदी सरकारला जात आमदार अडसड यांनी माहिती दिली की,संपूर्ण विश्वामध्ये भारत एकमेव देश असा आहे ज्याने प्रत्येक भारतीयाला मोफत लसीकरण केलेच एवढेच नव्हे तर पूर्वी विदेशांच्या भरोशावर असलेला भारताने शंभर पेक्षा जास्त देशांना लसी पुरवठा केल्यात त्याचा परिणाम आपल्याला पाहावयास मिळतो आहे जगातील सर्वच राष्ट्रांची भारता सोबत विनम्रतेने वागणूक दिसून येत आहे कोविड-१९ मध्ये जगातील सर्वात मोठे लसीकरण भारताने केले पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी अंतर्गत साडेतीन कोटी पेक्षा जास्त पक्के घरे बांधलीत बारा कोटी ग्रामीण व शहरी भागात शौचालय निर्माण केलेत बारा कोटी घरांना थेट नळाचे पाणी येण्यासाठी जलजीवन मिशन योजना निर्माण केली दहा कोटी परिवारांना उज्वला योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शन दिलेत महामारीच्या काळात ८० कोटी पेक्षा जास्त नागरिकांना मोफत राशन केंद्र सरकारने दिलेत आयुष्यमान भारत अंतर्गत पाच लक्ष रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली ९३०० पेक्षा जास्त जण औषधी केंद्रावर स्वस्त औषधी निर्माण करून दिल्यात खतांच्या किमतीत वाढ होऊ दिली नाही पीएम किसान निधी अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये थेट सहकार्य केलेत उच्च शिक्षणात दहा टक्के आर्थिक दुर्बल गटासाठी आरक्षण लागू केले केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात आला दिव्यांगांना समान आणि समान हक्क देण्यासाठी दिव्यांग प्रवर्ग ७ वरून २१ पर्यंत वाढवले व्यापार उद्योग व पर्यटनाला चालना देण्यासाठी २०१४ पर्यंत ७४ विमानतळ होते मागील ९ वर्षात आणखी ७४ नवीन विमानतळ बांधण्यात आले मागील नऊ वर्षात रेकॉर्ड ब्रेक ५३८६८ किलोमीटर नवीन महामार्ग निर्माण करण्यात आले देशात १११ नवीन जलमार्ग निर्माण झाले आधुनिक रेल्वे सेवा मेट्रो सेवा चालू करण्यात आल्या तंत्र शिक्षण व व्यावसायिक शिक्षण आयटीआयची संख्या वाढवण्यात आली सोबतच आयआयएमची संख्या सुद्धा वाढवली जगातील पहिला सूक्ष्म द्रव युरिया प्रकल्प भारतात साकारला भारतात विमानतळासारखीच भव्य दिव्य रेल्वे स्टेशन उभारलेत कश्मीर येथील चिनाब नदीवर सर्वात उंच रेल्वे पूल उभारण्याचा मान भारताने पटकावला तसेच जगातील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा निर्माण करणारा भारत एकमेव ठरला मनाली चे लेह अंतर चार ते पाच तास कमी करणारा सर्वात लांब महामार्ग बोगदा निर्माण केला डिजिटल भारत क्रांती आत्मनिर्भर भारत योजना आणली भ्रष्टाचाराचा संपूर्ण नाश करण्यासाठी थेट खात्यात लाभ हस्तांतरण केले युवकांसाठी स्टार्टअप योजना आध्यात्मिक विकासासाठी बुद्ध सर्किट,केदारनाथ धाम, सोमनाथ विकास, महाकाल उज्जैन कॉरिडोर, करतारपूर साहेब कॉरिडोर,काशी विश्वनाथ कॉरिडोर व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे आयोध्या येथे भव्य दिव्य राम मंदिर निर्माण कार्य, नवीन महामार्ग नवीन एअरपोर्ट नवीन पूल रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आले एक भारत एक संविधान कलम, सशस्त्र दलाला सक्षम केले सीमा रस्ते, सीमा भागात पूर्व रेल्वेचे जाळे निर्माण केले युद्ध वाणीबाणीच्या काळात सिरीयल नेपाळ व अफगाणिस्तानातून २० हजार पेक्षा जास्त भारतीयांना सुखरूप घरी आणण्यात आले यासोबतच प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदारसंघात करण्यात आलेल्या भरीव व विकासात्मक तसेच सर्वच क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यां ची माहिती आमदार प्रताप अडसड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या पत्रकार परिषदेला तालुका भाजपाध्यक्ष बाळासाहेब शिरपूरकर माजी अध्यक्ष मनोज डहाके शहराध्यक्ष गिरीश भुतडा सरचिटणीस अशोक शर्मा विठ्ठलराव राळेकर प्रामुख्याने उपस्थित होते