क्राइम

दहशत माजवून गुंडगिरी करणाऱ्या युवकाची हत्या

Spread the love

आरोपींचे आत्मसमर्पण

चंद्रपूर / पी संजू 

              शहर आणि  परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडांची चार लोकांनी मिळून हत्या केल्याची घटना बल्लारपूर शहरात घडली आहे . दीपक रामाआसरे कैथवास असे मृत तरुणाचे नाव आहे. हत्येनंतर आरोपींनी पोलिसात जाऊन आत्मसर्पण केले आहे.न

चंद्रपूरच्या परिसरात सतत दहशत निर्माण करणाऱ्या बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कारवा रोड येथे राहणारा दीपक कैथवास या युवकाची चार जणांनी मिळून हत्या केली व चारही आरोपींनी पोलीस स्टेशनमध्ये जात आत्मसमर्पण केले. मृतक दीपक कैथवास हा गुंड प्रवृत्तीचा युवक असून परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम करत राहायचा. यादरम्यान एका युवकाला त्याने बेदम मारहाण केली होती. त्याचा काटा काढण्यासाठी 4 जणांनी मिळून दगडाने ठेचून दीपकची निर्घृण हत्या केली. अर्जुन राजू कैथवास, प्रथम शंकर पाटील, गौरव राजू लिडबे व अमन दुखशौर कैथवास असे खून केलेल्या आरोपींची नावं आहेत.

बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close