हटके

ती ती नसून तो असल्याचे आले समोर 

Spread the love

ती बुरखाधारी महिला निघाली पुरुष  ; शंकेच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी पकडले

नागपूर  / पी संजय

           महिलेच्या वेशात बुरखा घालून फिरणाऱ्या व्यक्तीवर संशय आल्याने सुरक्षा रक्षकाने त्याला ओळख पत्राबद्दल बिचारणा केली असता त्याचे बिंग फुटले. आणि ती ती नसून तो असल्याचे समोर आले.

 इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान बुरखा व त्यावर ॲप्रॉन घालून फिरणाऱ्या एका पुरुषाला सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. मागील १५ दिवसांपासून तो या वेशात फिरत होता. या प्रकरणाने रुग्णालयात खळबळ उडाली असून, या मागे त्याचा काय उद्देश होता, याचा तपास पोलिस करीत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्सचा मुख्य प्रवेशद्वारावर कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचा (एमएसएफ) जवानाला बुरखा व त्यावर ॲप्राॅन घातलेला महिलेवर संशय आल्याने थांबविले. रुग्णालयाचा आयकार्डची विचारणा केली. ती उत्तर देत नसल्याचे पाहता महिला सुरक्षारक्षकांना बोलविण्यात आले. तिला बोलते करण्याचा प्रयत्न करीत असताना तिने बाईचा आवाज काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे संशय आणखी बळावला. तिचा बुरखा काढला असता आत दाडी-मिशी असलेला तरुण होता. नावाची विचारणा केल्यावर त्याने आपले नाव जावेद सांगितले. असे का करतो, असे विचारल्यावर त्याने स्वत:ला तृतीयपंथी असल्याचे सांगितले. पुरुषांमध्ये आवड असल्याने रुग्णालयात मागील १५ दिवसांपासून फिरत असल्याचे तो म्हणाला. सुरक्षारक्षकांनी त्याला तहसील पोलिसांच्या हवाली केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close