सामाजिक

महावितरणच्या हेकेखोर पणामुळे नागरिकांना सोसावा लागला आर्थिक भुर्दंड

Spread the love

वीज गुल झाल्याने आइसक्रीम वितळल्या, पीठ गिरणीही बंद:
नागरिकांची गैरसोय : तक्रार करूनही महावितरणची कारवाई नाही:

नागपूर : शिवशक्तीनगरमध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वीज गुल झाली. याची तक्रार करूनही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने काहीच कारवाई न केल्याने परिसरातील आइसक्रीम पार्लरमधील २५ हजारांच्या आइसक्रीम वितळल्या असून, मंगळवारपासून पीठ गिरणीवर दळण अडकून पडल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

मानेवाडा रिंग रोडवरील शिवशक्तीनगर नं. ३ येथे गणेशराव दलाल यांची श्री गजानन फ्लोअर मिल या नावाने पीठ गिरणी आहे. मंगळवारी दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे गणेश दलाल यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली. परंतु महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काहीच कारवाई न केल्यामुळे मंगळवारपासून नागरिकांचे दळण पीठ गिरणीवर अडकून पडले आहे. बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने अनेक नागरिकांना कामाच्या ठिकाणी जेवणाचा डबा घेऊन जाता आले नाही. तसेच बाजूला असलेल्या दिनशॉ आइसक्रीमच्या दुकानातील २५ हजार रुपये किमतीच्या आइसक्रीम वितळून नुकसान झाले. त्यामुळे महावितरणने झालेले नुकसान भरून देण्याची मागणी लीला दलाल यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close