सामाजिक उपक्रम राबवून केला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस दर्यापूर येथे साजरा
दर्यापूर प्रतिनिधी —
आज दर्यापूर येथे युवासेना प्रमुख माजी पर्यावरण मंञी आ. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस युवासेना उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वात दर्यापूर येथे ठिक ठिकाणी सामाजीक उपक्रम राबवुन सामाजिक संदेश देऊन केला साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदाम गवारे, डॉ. संतोष डाबेराव व कर्मचारी यांचा सहभागाने साजरा करण्यात आला. त्यानंतर दर्यापूर शहरांमध्ये ठीक ठिकाणी जाऊन दिव्यांग, गोरगरीब जनतेला सुद्धा अल्पोहार वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. या वेळी अभिजीत मावळे युवासेना तालुकाप्रमुख, प्रतीक राऊत युवासेना विधानसभा समन्वयक, सौ प्रांजली कैलास कुलट दर्यापुर विधानसभाप्रमुख युवतीसेना, सौ सोनाली प्रतीक राऊत दर्यापुर तालुकाप्रमुख युवतीसेना,सागर पाटील वडतकर, विशाल बगाडे, मनोज लोखंडे, निलेश पारडे,भारत गावंडे, अनिकेत उन्नतकर, साहिल बारब्दे, नितीन माहुरे,अनिकेत वाघझाळे, चेतन सदार, किशोर थोरात, प्रशांत भोयर, सुनील भुते, शिवराम थोरात, प्रज्वल जामनेकर, अक्षय लायले, अमर हागे, यश गावंडे, अक्षय नांदुरकर, आदित्य वाघपांजर, करण भालेराव, निखिल सरदार, आदित्य इंगळे, आशिष पळसपगार, वैभव तेलगोटे, बच्चू पोटे, संतोष चव्हाण, संदीप सोनटक्के आदीनी क्रार्यकम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाडी सहकार्य केले व मोठ्या प्रमाणात युवासेना,युवतीसेना पदाधिकारी, कार्येकते उपस्थित होते