हटके

 काय म्हणता …..बैलगाडा शर्यतीतील बैल सरळ तलावात

Spread the love

पुणे / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                 बैलगाडा शर्यत ही ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय असे आयोजन . ही शर्यत पाहायला आबालवृद्ध अलोट गर्दी करतात. जेव्हा बैलगाड्या धावपट्टीवर धावतात तेव्हा आबालवृद्धांकडून वाजविन्यात येणाऱ्या शिट्ट्या , आणि हातवारे पाहण्यासारखे असतात. पण या शर्यतीत धोका देखील तसाच असतो शर्यतीतील बैल जर बिथरले तर ते कोणाच्या अंगावर धावून जातील याचा काही नेम नसतो. असाच प्रकार व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की बैलगाडा शर्यतीतील एक बैलगाडी धावपट्टी सोडून तलावाच्या दिशेने धावत सुटते . आयोजक स्पीकर वरून अरे त्या बैलगाडीला धरा , बैलांना धरा अश्या घोषणा करत असतो. पण मदतीपूर्वीच बैल गाडा आणि धुरकऱ्याला  सरळ तलावात घेऊन जातात.

याबद्दल मिळालेल्या माहिती नुसार  धावपट्टीवर बैलगाड्या उभे राहिल्या. एका समान रेषेत. माईकवरुन घोषणा झाली आणि झेडेकऱ्याने झेंडा फडकावला. झाले. बैलगाड्या सुटल्या. प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्या आणि गोंधळ सुरु केला. अपेक्षीत होते की बैलगाड्या सरळ रेषेत धावपट्टीवरुन धावाव्यात. पण घडले भलतेच दोन बैलगाड्यांनी धापट्टी सोडली. बैलगाडाचालक आपले सर्व कसब पणाला लावून गाडीवर आणि बैलांवर नियंत्रण ठेवायचा पुरेपूर प्रयत्न करत होते. पण त्यांना नियंत्रण मिळवता आले नाही. दोन बैलगाड्या धावपट्टी सोडून धावू लागल्या. या दोन्ही बैलगाड्या शर्यतीच्या ठिकाणापासून बाजूला असलेल्या एका तलावाच्या दिशेने धावल्या. माईकवरुन सूचना केल्या जात होत्या. बैलगाडी धरा. बैल पाण्यात जातील. पण आजूबाजूच्या मंडळींना बैलगाडीजवळ पोहोचेपर्यंत कार्यक्रम झाला होता. दोन्ही बैलगाड्या पाण्यात शिरल्या होत्या.

 

 

 

पाण्यात शिरलेल्या बैलगाड्यांना पकडण्यासाठी संबंधित बैलगाडा मालकांच्या तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या. ते पोहून आंतर पार करु लागले. पण शेवटी बैलांचा वेग आणि माणसाच्या पोहण्याचा वेग. यात बरेच अंतर असते. त्यामुळे बैल पुढेच जाऊ लागले. अखेर बैलांच्या नाकात पाणी शिरले तेव्हा कुठे बैलांची गती कमी आली. तोवर तरुणही बैलापर्यंत पोहोचले होते. त्यांनी बैलगाडी ताब्यात घेतली. बैलांवर नियंत्रण मिळवले आणि त्यांना काठाला आणले. या सर्व थरारात दुर्घटना होण्याची शक्यता अधिक होती. कारण बैल पाण्याच्या मध्यभागी गेले होते. यात बैलगाडा चालकाला पोहता येत नसते तर त्याचे प्राण जाण्याची शक्यता कैक पटींनी वाढली होती. मात्र, योग्य वेळी अनेक घटनाय योग्य पद्धतीने घडल्या. म्हणून अनुचीत घटना टळली. आपणही बैलगाड्यांचा हा थरार येथे पाहू शकता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close