प्रेमात अपयश आलेल्या तरुणाने केले असे कृत्य

नागपूर / नवप्रहार न्यूज नेटवर्क
वयात आल्यावर विरोधी लिंगाबद्दल आकर्षण ही नैसर्गिक बाब आहे. तरुण तरुणी या वयात प्रेमात पडतात. तरुणीच्या प्रेमात पडलेल्या युवकाला तरुणीने धोका दिल्याने प्रेमात आंधळा झालेल्या त्या व्यक्तीच्या डोक्यावर याचा परिणाम झाला आणि तो पागला सारखा आणि अश्यातच त्याच्या हातून खुना सारखा गंभीर गुन्हा घडला. आता त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
दिनेश धोंडिबा सदाफुले (वय ३२) पुण्यातील वारजे माळवाडी, रामनगर येथील रहिवासी आहे. घरची स्थिती ठिकठाक असणारा दिनेश सध्या रेल्वे पोलिसांच्या कोठडीत आहे. दिनेशची घरची स्थिती ठिकठाक होती. तो मिळेल ते काम करून छानछोकीने राहत होता. एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले अन् त्यांची प्रेमकथा बहरली. त्या दोघांनी ‘जिना मरना तेरे संग’ असे ‘कसमे-वादे’ही केले. तिच्या प्रेमात दिनेश पुरता गुंतला असताना अचानक तिने दगाबाजी केली. दुसरा निवडला अन् त्याच्याशी लग्नही केले. प्रेयसीच्या या पवित्र्यामुळे दिनेश सैरभैर झाला. तिच्या विरहात चार वर्षांपासून वेड्यासारखा वागू लागला. घर सोडून बेवारस सारखा कुठेही फिरू लागला. पोट भरण्यासाठी कोणतेही काम करायचे अन् कुठेही झोपायचे, असे त्याचे सुरू झाले. याच अवस्थेत तो चार महिन्यांपूर्वी भटकत भटकत नागपुरात आला. कॉटन मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना रात्रंदिवस काम अन् पोटभरेल एवढी मजुरीही मिळते. त्यामुळे छोटे मोठे काम करून पोट भरायचे आणि बाजुच्या रेल्वेस्थानकावर कोणत्याही फलाटावर झोपायचे, असा त्याचा दिनक्रम बनला.
त्याचा ना कुणी दोस्त होता ना कुणी दुष्मन.जितेंद्र उर्फ टोपी (रा. बलोद, छत्तीसगड) याच्याशी ओळख होती. मात्र, गुरुवारी रात्री दारूच्या नशेत कुठल्याशा किरकोळ कारणावरून त्याच्याच सारखा बेवारस जीवन जगणाऱ्या जितेंद्रसोबत वाद झाला. अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या अन् त्यामुळे रागाच्या भरात त्याने बाजुला पडून असलेल्या सिमेंटच्या फळीने दगडाने ठेचून झोपेत असलेल्या जितेंद्रची हत्या केली रेल्वेच्या पोलिस निरीक्षक मनीषा काशिद यांनी त्याला न्यायालयात हजर करून त्याची १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळवली.
.