घाटंजी तालुक्यात भुदान यज्ञ मंडळ जमीन वाटपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार..!0
भुदान यज्ञ मंडळाचे दोषीवर कार्यवाही करण्याची गरज.
भुदान यज्ञ मंडळ जमीन मिळण्यासाठी द्यावी लागते लाखो रुपयाची माया.
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
घाटंजी_ भुदान यज्ञ मंडळ नागपूर जमीन वाटपात अनेक प्रकारचा गैरवापर झाला आहे. गरीब व वंचित विधवा महिला यांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी भूमीहीन शेतकरी, शेतमजूर यांना उपजीविकेचे साधन म्हणून
भुदान यज्ञ मंडळ यांची जमीनी कसण्यासाठी वाटप करण्यात यायच्या. परंतु भुदान यज्ञ मंडळाचे सचिव एकनाथ डगवार व सदस्य रणजित बोबडे यांनी पदाचा गैरवापर करून एजंट मार्फत लाखो रुपये गोळा करून भुदान यज्ञ मंडळाची शेत जमीन नियमबाह्य वाटप केल्याचा आरोप होत आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांना भुदान यज्ञ मंडळाची जमीन देणे, काही लाभार्थी यांच्या स्वतःच्या वडिलोपार्जित जमीन असतांना पुन्हा जमीन देणे, अविवाहित युवक युवती व श्रीमंतांना जमीन वाटप करण्यात आल्या. काही लाभार्थी कुटुंबातील सदस्य नोकरीवर असतांना शासनाचा आयकर भरणा करणाऱ्या लाभार्थीना ही जमीन वाटप करण्यात आली आहे. भुदान यज्ञ मंडळाच्या जमीनी वाटप व तहसीलदार यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालयातील अव्वल कारकून सचिन बागडे, मंडळ अधिकारी, तलाठी हे सर्व आर्थिक रक्कम घेऊन नियमबाह्य शेत जमीन ७/१२ उतारयावर नोंद करण्यात आली. सदर जमीन वाटप मध्ये भूदान यज्ञ मंडळातील कार्यालयीन लिपिक वासनिक व दोन दलाल व भूदान यज्ञ मंडळ सदस्यांनी लाखो रुपये घेऊन श्रीमंत लाभार्थीना शेत जमीन वाटप करण्यात येत असतांना सुद्धा नियमबाह्य शेत जमीन वाटप करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती पुढे येत आहे. मा. जिल्हाधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पांढरकवडा यांनी २०१३ पासून तर आज पर्यंत भूदान यज्ञ मंडळ जमीन वाटपाची सखोल चौकशी केली तर खूप मोठा भ्रष्टाचार बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.