वळू घराच्या छतावर गावकऱ्यांची दमछाक
पिलीभीत / नवप्रहार न्यूज नेटवर्क
वळू (सांड ) म्हटलं की ये भारी भरकम जीव डोळ्यासमोर उभा राहतो. सांड रस्त्यात जरी उभा दिसला की अनेक ल9क थबकतात किंवा आपला मार्ग बदलतात. अनेक वेळा सांड बिथरला की तो कोणाच्याही अंगावर धावून जातो. त्यामुळे लोक त्याच्यापासून वाचून असतात.सहसा सांड घराच्या कंपाउंड मध्ये किंवा जास्तीत जास्त घरात घुसल्याच्या घटना क्वचित घडतात. जर तुम्हाला सांगितले की सांड घराच्या छतावर चढला तर तुमचा विश्वास बसणार नाही.पण घराच्या छतावर सांड चढल्याची घटना घडली आहे. त्याला खाली उतरवण्यासाठी मात्र नागरिकांची दमछाक झाली.
. एक पिसाळलेला वाळू गायीच्या मागे धावत होता. गाय स्वरक्षणार्थ शेतकरी नन्हेलाल यांच्या घरावर चढली, तर तिच्या मागे वाळूही वर चढला. गावकऱ्यांनी हे पाहिल्यावर गावात एकाच खळबळ उडाली. परंतु नन्हेलाल यांच्या घराचं काही नुकसान होऊ नये म्हणून सर्वांनी या दोघांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गायीला काही वेळातच खाली उतरवण्यात यश आलं, मात्र वजनदार वाळू काही सहजासहजी खाली उतरायला तयार नव्हता.
गावकरी त्याच्याशी अक्षरश: झुंजले परंतु वाळू आपल्या जागेवरून किंचितही हलला नाही. तब्बल 10 तास तो तिथेच बसून होता. गावकऱ्यांनी अखेर याबाबत जिल्हा पशू चिकित्सा कार्यालयाला माहिती दिली. त्यानंतर तातडीने बचावपथक तिथे दाखल झालं.
वाळूचं वजन अतिशय जास्त असल्याने त्याला सहज उतरवणं शक्य नव्हतं. त्यामुळे पथकाने त्याला इंजेक्शनद्वारे काही वेळासाठी भूळ देऊन उतरवायचं ठरवलं. मात्र गावकऱ्यांनी त्यांना असं करण्यापासून थांबवलं. काहीही झालं तरी कोणत्याही प्राण्याला इजा करणं, हे धर्माच्या विरोधात आहे, असं त्यांचं म्हणणं होतं.
मात्र बचाव पथकाने त्यांना समजवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांनी त्यांचं काहीही ऐकून न घेता त्यांना परत पाठवलं. दरम्यान, आतादेखील गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच या वाळूला सुखरूप खाली उतरवलं जाईल, असं जिल्हा पशू चिकित्साधिकारी डॉ. अरविंद कुमार गर्ग यांनी सांगितलं आहे. बातमी लिहेस्तोवर गायीला सुखरूप खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.