किशोर पटेल यांचे आमरण उपोषण सुरूच. आज (सोमवार) पाचवा दिवस.
महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेत.
धामणगाव रेल्वे :- शेतात जाणारा रस्ता अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी शेतकरी किशोर देवजीभाई पटेल यांचे आमरण उपोषण अद्यापही सुरू असून आज सोमवारी दि ५ जून हा उपोषणाचा पाचवा दिवस आहे.पेरणीच्या तोंडावर शेतीची कामे बाजूला सारून भर उन्हात चार दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरू असतांना महसूल प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे.
वाघोली ते दाभाडा पांदन रस्त्यावर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण आहे त्याचं रस्त्यावरून किशोर पटेल यांचे शेतात जाण्यासाठी त्यांच्या हक्काचा रस्ता आहे.सदरच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी तब्बल सहा वर्षांपासून किशोर पटेल यांनी महसूल प्रशासनाला वारंवार विनंती अर्ज केलेत.दरम्यान महसुली प्रकरण चालवून प्रशासनाने या संदर्भात तीनदा पांधणरस्ता मोकळा करण्यासाठी आदेशही पारित केले आहेत.तरीसुद्धा महसूल कार्यालयात मागील सहा वर्षांपासून पायपीट करूनही सदरचा पांधणरस्ता मोकळा झालेला नसल्याने अखेर १ जून पासून किशोर पटेल तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे.मागील चार दिवसात प्रशासनाकडून त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र निव्वळ आश्वासने देऊन पांधनरस्ता मोकळा करण्यासाठी महसूल अधिकारी डोळेझाक करीत असल्याचा आरोप यावेळी पटेल यांनी केला आहे.आज सोमवार रोजी उपोषणाचा पाचवा दिवस असतांना या विषयात अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने पटेल हे मधुमेह व रक्तदाब ग्रस्त आहेत त्यामुळे त्यांची प्रकृती केव्हा बिघडेल हे सांगता येत नाही मात्र तरीसुद्धा किशोर पटेल यांनी पांधण रस्ता अतिक्रमण मुक्त झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
————————————-
भूमीअभिलेख कार्यालयाने मोजणी व खुणा कायम करून रस्ता मोकळा करण्यासाठी १४ जून ही तारीख दिली होती.ती कमी करून आज ५ जून रोजी भूमिअभिलेख,महसूल पथक व पोलीस बंदोबस्तासह सदरचा पांधणरस्ता मोकळा करण्यात येईल.
वासीमा शेख
तहसीलदार, धामणगाव रेल्वे