सौ सुहासिनीताई धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पूर्व महिला मोर्चाच्या वतीने मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अकोला / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे चा वर्ग दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. याचीच दखल भाजपा पूर्व महिला मोर्चाच्या प्रभाग क्रमांक 6 वतीने घेण्यात आली. निकिता राहुल देशमुख भाजपा पूर्व महिला मोर्चा अध्यक्ष यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सर्वप्रथम कू. पूर्वा शरद राठी तिने या दहावीच्या परीक्षेत 500/500 प्राप्त केले सर्वप्रथम तिचे कौतुक करण्यात आले आमच्या मार्गदर्शिका सौ सुवासिनीताई धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुमारी पूर्वा शरद राठी हिचा सत्कार करण्यात आला तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील कु. आर्या झाडोकर 96% सर्वज्ञ मनीष चव्हाण 95%, श्लोक जयेश चांदरणी 90% ,, कु. आर्या आशिष खानझोडे 93%, यश गजानन बढे 96% निकुंज सं.रांदल 94.20% इ.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .आणि उज्वल भविष्य साठी शुभेच्छा देण्यात आला.या साठी सौ. निखिता राहुल देशमुख, सौ ममता संजय सारडा वैशाली प्रदीप बारड सौ अपर्णा शिवाजी कराळे सौ. पूजा तायडे सौ सारिका सारडा सौ तारा थोरवे या प्रामुख्याने उपस्थित होत्या