दहिगाव रेचा येथे अहिल्याबाई होळकर महिला सन्मान कार्यक्रम संपन्न
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला सन्मान पुरस्कार सन 2023- 24 करीता, ग्रामपंचायत दहीगांव रेचा, ता. अंजनगांव सुर्जी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सरपंच सौ. मंगलाताई डोंगरे, उपसरपंच श्री विषालभाऊ इंगळे, सचिव सौ. वैशालीताई कोठेवार, पोलीस पाटील श्री अरविंदराव रेचे, समस्त ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सर्व बचतगटाच्या महीला सदस्य तथा ग्रामस्थांच्या वतीने पु. अहील्यादेवी होळकर यांच्या फोटोचे पूजन करून जयंती साजरी केली!
ह्यामध्ये गावातील पुरस्कार प्रदान करणार्या समितीच्या वतीने महीला सन्मान पुरस्कारासाठी अर्ज सादर केलेल्या दोन महीला भगिनींच्या कार्याची दखल घेऊन त्या महिलांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देण्यात आला! यामध्ये पुरस्कार विजेत्या श्रीमती संगीताताई अरुणराव उके व सौ. मायाताई नंदलाल बोरकर यांना शाल श्रीफळ ट्रॉफी प्रमाणपत्र तसेच शासनाच्या आदेशानुसार ₹.500/- नगदी स्वरुपात देण्यात आले
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. वृषालीताई वाघमारे, सौ. चैतालीताई सावरकर, श्री रुपरावजी इंगळे, श्री उध्दवराव गिते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते!*