रामपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी लगतच्या रामपुर या आदर्श गावी बुधवारला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त समाजातील कतृत्ववाण महिला सन्मान पुरस्काराचे ग्रामपंचायत रामपूरच्या वतिने आयोजन करण्यात आले.यावेळी सौ. योगिताताई गजाननराव धुर्वे आणि सौ. सुवर्णा नितिन कनाके यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.सोबतच ग्रामीण धावपटू कु. वैष्णवी सिडाम या विद्यार्थ्यांनीचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श रामपूरच्या सरपंचा सौ. वृंदाताई अशोकराव पेंदोर होत्या तर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते मा.मोतीरामजी कनाके उपस्थित होते.या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून स्व. शांताबाई भोयर बहुउद्देशीय संस्थेचे सचिव पावडे साहेब ,क्षेत्रीय तंत्रज्ञ खान साहेब, पोलिस पाटिल मंगलाताई पाटील, ग्रामकार्यकर्ते राजेंद्र पाटील,अंगणवाडी सेविका सोनुताई मुनेश्वर, सोनलताई कनाके, दुर्गाताई सिडाम, प्रभाकरराव कनाके,गजानन धुर्वे,अर्जुन मंगाम राहुल सरपे, महादेवराव परेकार,माधवराव कनाके आणि जि.प. शाळेचे विद्यार्थी यांणी बहुसंख्येनी हजेरी लावली. सदर कार्यक्रम पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्तविक हे रामपूरचे ग्रामपंचायतीचे सचिव सरकुंडे यांनी केले तर ,कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक राजेंद्र गोबाडे व उपस्थिताचे आभार युवा कार्यकर्ता अंकुर मरस्कोल्हे यांनी माणले.