पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त भव्य शोभायात्रा,
महामार्गावरील महापुरुषांचे पूजन, मिरवणुकीत अनेकांनी पिवळे वस्त्र केले परिधान.

नेर प्रतिनिधी /% नवनाथ दरोई
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव समिती, मौर्य क्रांती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्याबाई होळकर चौकातील अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे संजय देशमुख, नेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पवन जयस्वाल,वैशाली मासाळ यांच्या शुभहस्ते पूजन करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभा यात्रेमध्ये अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा रथावर ठेऊन रॅली काढण्यात आली. अहिल्याबाई होळकर यांच्या वेशभूषेत वैष्णवी उघडे ह्या घोड्यावर विराजमान होत्या.शोभा यात्रा अमरावती यवतमाळ महामार्गावरुण शिवाजी शाळा, पोलीस स्टेशन, डॉ बाबासाहेब आंबेडकर ,सराफ लाईन,बारिपुरा,
तेलीपुरा या मार्गाने काढून पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर येथे समारोप करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख,डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्थेचे, मौर्य क्रांती संघाचे, मल्हार सेनेचे अनेक समाज बांधव उपस्थित होते.