अंजनगाव च्याओम इंटरनॅशनल ज्युनिअर सायन्स कॉलेज अंजनगाव सुर्जीचा 12 वी चा निकाल १०० टक्के
निकालाची परंपरा कायम …
अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
नुकत्याच लागलेल्या बारावी बोर्ड च्या निकालात ओम इंटरनॅशनल ज्युनिअर सायन्स कॉलेज अंजनगाव सुर्जीने आपल्या १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट परसेंटेज सोबत वैभव काळेने गणित विषयात 93 गुण घेतले आहेत तर जीवशास्त्र या विषयात 89 गुण घेतले आहेत, समीक्षा गीतेने गणित व फिजिक्स विषयांमध्ये प्रत्येकी 88 गुण प्राप्त केले आहे तर जीवशास्त्र विषयात 85 गुण घेतले आहेत. केतकी वार्केने गणित व फिजीक्स विषयांमध्ये प्रत्येकी 88 गुण घेतले आहे तर जीवशास्त्र विषयात 87 गुण प्राप्त केले आहे.तनिष्का रक्षेने जीवशास्त्र विषयात १०० पैकी ८७ गुण प्राप्त केले आहे, रेणुका भास्कर व जान्हवी कोठेकर या विद्यार्थिनीने गणित विषयात प्रत्येकी १०० पैकी 85 गुण प्राप्त केले आहे.भाषा विषयांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन प्राप्त केले आहे.अर्पिता सुकाळकरने इंग्रजी विषयात १०० पैकी 92 गुण तसेच जागृती अढाऊने मराठी विषयात १०० पैकी 89 व इंग्रजी विषयात १०० पैकी 85 गुण प्राप्त केले आहे. ओम इंटरनॅशनल ज्यू सायन्स कॉलेज च्या एकूण ५० विद्यार्थ्यांनी १२ वी बोर्ड ची परीक्षा दिली होती त्यापैकी ५० ही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण घेऊन यश प्राप्त केले आहे.ओम इंटरनेशनलस्कूल ज्यू.कॉलेज मधील वर्ग १२ चे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा निकाल 100% लागल्याबददल कॉलेज चे प्राचार्य संजय व्ही. होले यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कॉलेजचे अध्यक्ष श्री दिनेश भोंडे , सचिव श्री राजेश बोड़खे व कोषाध्यक्ष श्री जितेन्द्र कट्यारमल तसेच सर्व पालकांचे हार्दिक अभिनंदन व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्या करीता शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषयाकरिता प्रा.डॉ. कुणाल देशमुख, गणित विषया करिता प्रा.पंकज बनाईत, फिजिक्स विषयाकरिता प्रा.वैभव साखरे, केमिस्ट्री विषयाकरिता प्रा. आदित्य ब्राह्मणकर , मराठी करिता प्रा.पूजा हनुवंते, तसेच इंग्रजी विषया करिता प्रा. निलेश गोमासे सरांचे मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेचे अध्यक्ष .दिनेश भोंडे तसेच कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणा करीता ओम इंटरनेशनल कॉलेज मधून पुढील शिक्षणासंबधी कॉलेज मधून मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन प्राचार्य श्री संजयराव होले यांनी केले आहे.