घाटंजीतील ठाणेदारांणी घेतली स्वच्छता मोहीम हाती.
समाजात सर्वधर्म समभावणा व शांतता नांदावी याकरिता ठाणेदार सुषमा बाविस्कर प्रयत्नशिल.
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी-समाजात शांतता व सलोखा नांदावा याकरिता घाटंजीतील दबंग ठाणेदार सुषमा बाविस्कर यांणी घाटंजीतील थोर समाज सुधारक,महामानव व संत- महात्मे यांच्या प्रतिमांचे तसेच घाटंजीतील महात्माचे उभारण्यात आलेली चौक या परिसरातील साफसफाई करत समाजात जाती- पाती पलिकडे जपण्यासारखी खरी माणूसकी आहे व माणसातील माणूसकी जिवंत राहली तरचं समाज जिवंत राहील हे पटऊन दीले. या स्वच्छता मोहीमेत घाटंजीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भगवान गौतम बुध्द, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौक, शहीद शेडमाके चौक, शिवाजी चौक तैलचित्र, गणराज वाडा चौक, सुभाषचंद्र बोस चौक व जयस्तंभ चौक या परिसरातील स्वच्छता करण्यात आली. समाजात स्वच्छता व शांतता नांदावी व समाजात तेढ निर्माण न होता सर्वधर्म समभावणा नांदावी या करिता घाटंजी पोलिस प्रशासण व ठाणेदार बाविस्कर यांच्या कडून हा उपक्रम राबवीण्यात आला. या स्वच्छता मेहीमेत स्वत: ठाणेदार बाविस्कर,सिडाम साहेब, वामन जाधव साहेब, सामाजिक कार्यकर्ते मधूकर निस्ताणे, संघपाल कांबळे,पत्रकार महेंद्र देवतळे, संतोष अकल्लवार, पांढूरंग निकोडे व ईतरही स्वच्छता दूत उपस्थित होते.