भ्रष्ट्राचार

कापूस व्यापारांकडून शेतकऱ्यांची लूट सूरू साई कॉटन अँड जिनिंग फॅक्टरी मधील प्रकार.

Spread the love

घाटंजी / सचिन कर्णेवार
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीत हर्रासपद्धतीने कापूस चढत्या दराने व्यापारी हर्रास करतात मात्र जिनात कापसाची गाडी खाली झाल्यानंतर व्यापारी मनमानी करून 100 ते 200 रुपये दर कमी करतात या मनमानी करणाऱ्या व्यापारांवर नवनिर्वाचित बाजार समितीचे संचालक मंडळ कार्यवाई करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार.
घाटंजी कृ. उ. बाजार समिती ही कापसासाठी मोठी बाजारपेठ म्हणून जिल्ह्यात नामांकीत आहे. त्यामुळे या बाजारपेठेत चांगला दर मिळावा या आशेपोटी घाटंजी तालुका व्यतिरिक्त इतरही तालुक्यातून शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी घाटंजी बाजारपेठेत आनत असतो परंतु, इथे मात्र व्यापारी शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत आपली मनमानी करत शेतकऱ्यांची लूट सरास केली जाते. गेल्यावर्षी शेतकऱ्याला मे, जून महिन्यात चांगला दर मिळाला होता त्या आशेपोटी शेतकरी आपला कापूस आजपर्यंत घरात साठवून ठेवला परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे कापसाला भाव नाही आणि दुसरीकडे सावकारांचे देणे आणि शेतीसाठी बी,बियाणे आणि खतांची सोय करावी यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ पाहावयास मिळत आहे. या अडचणीमुळे नाईलाजाने शेतकऱ्यावर आपला कापूस कमी दरात विकण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेत व्यापारी वर्गातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे दिसत आहे. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस मार्केट यार्ड मध्ये शेतकरी कापूस विक्रीसाठी आणला असता हर्रास पद्धतीने कापूस विक्री केली जाते कापूस मार्केटमध्ये हर्रास झाल्यानंतर जो दर कापसाला किंवा शेतकऱ्यांच्या इतर मालाला दर दिला जातो त्यात फेरबद्दल करून तो दर कमी करण्याचा अधिकार कुणालाही नसतो. परंतु घाटंजी येथील साई कॉटन जिनिंग अँड फॅक्ट्री चोरांबा रोड घाटंजी येथील ग्रेडर मार्फत जिनात कापसाची गाडी आणल्यानंतर ती कापसाने भरलेली गाडी अर्धीजास्त खाली केल्यानंतर उर्वरित कापूस चांगला असूनही त्यात पाणीनसूनही पाणी असल्याचे कारण सांगितल्या जाते अथवा कापसाला पती लागली असल्यास तो खराब कापूस असल्याचे बहाणे बनवून हे कापूस त्यांच्या मनमानी दरात मागतात शेतकरी कितीही प्रामाणिकपणे खरा बोलत असला तरी जिनिंग मालक ऐकायला तयार नसतो. शेतकरी मागितलेल्या दरात कापूस देण्यास नकार दिल्यास तुमची खाली झालेली गाडी भरून घ्या किंवा मी तुमचा कापूस घेत नाही म्हणून धमक्या देतात त्यामुळे नाईलाजाने दुरून आलेल्या शेतकऱ्याला परत कापूस घेऊन जाण्यासाठी गाडीचा भाडा न परवडणारा असल्याने आणि शेतकऱ्याला आर्थिक व्यवहारासाठी पैशाची गरज असल्याने घेईल त्या भावात कापूस विकून मोकळा होतो असे प्रकार अनेक वर्षापासून चालू असून आज पर्यंत कोणत्याही बाजार समितीच्या संचालकाणी शेतकऱ्यांची होत असलेली लूट डोळ्याने पाहत असतांना त्या विरोधात आवाज उठवीला नाही. त्यामुळे ही अनेक वर्षांपासून होत असलेली व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची लूट नवीन सभापती आणि उपसभापती थांबवतील का?. असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडलेला आहे.आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत आर्थिक लूट करणाऱ्या धनधाकट् साई जिनिंगच्या व्यापाऱ्यांवर (मालकांवर) कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती काही कार्यवाही करतील का? आणि अनेक वर्षांपासून होत असलेला शेतकऱ्यांवरील अन्याय मोडून काढतील का? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close