विदर्भात प्रथमच… वर्धा प्रिंट एक्सपो 2023* चे 21 मे रोजी आयोजन
प्रिंटिंग क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी परवनी
– वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशनचे उपक्रम
वर्धा / प्रतिनिधी
वर्धा, विदर्भातील प्रिंटिंग व्यवसायिकांसाठी ” *वर्धा प्रिंट एक्सपो 2023″* चे दिनांक 21 मे रविवार रोजी वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशन तर्फे सकाळी दहा वाजता हॉटेल हरिराम टावर, न्यू आर्ट कॉलेज जवळ, बॅचलर रोड वर्धा येथे आयोजन करण्यात येत आहे कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले करणार आहेत, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पद बाळासाहेब आंबेकर अध्यक्ष महाराष्ट्र मुद्रण परिषद मुंबई हे भूषविणार आहेत,
अत्याधुनिक प्रिंटिंग व्यवसायातील नवनवीन प्रिंटिंग मशीन्स, मटेरियल सप्लायर, तसेच प्रिंटिंग व्यवसायिकांसाठी शासकीय योजनेची माहिती करिता जिल्हा उद्योग केंद्र मार्फत मार्गदर्शन दिल्या जाणार आहे तसेच व्यवसायाला लागणारे कर्ज करिता विविध बँकेचे स्टॉल एक्सपो मध्ये असणार आहे. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात असे आयोजन पहिल्यांदाच होत आहे संपूर्ण वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती जिल्ह्यातील प्रिंटिंग व्यावसायि यात सहभागी होणार आहेत.
शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रिंटिंग व्यावसायिकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, नवीन अत्याधुनिक मशीनरी पाहायला मिळाव्या हेच उद्दिष्ट सामोरे ठेवूनच “वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशन” द्वारा *वर्धा प्रिंट एक्सपो 2023* चे आयोजन करण्यात आले आहे, एक्सपो ची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. जास्तीत जास्त मुद्रण व्यवसायिकांनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.