वरुड तालुक्यातील जरूड येथील एसबीआयचे गॅस कटरने एटीएम फोडणारे दोन आरोपी मध्य प्रदेश व हरियाणातून जेरबंद
मोर्शी(संजय गारपवार)
स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई ,आरोपी मुद्देमालासह वरुड पोलिसांच्या ताब्यात
शनिवार दिनांक २० मे रोजी वरुड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार वरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जरूड येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम गॅस कटरच्या साह्याने दि.१२ मे रोजी पहाटे फोडून १६ लाख रुपये रोख स्वरूपात चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादी ईपीएस कंपनीचे मॅनेजर पवन अरुणपंत भोकरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध वरुड पोलीसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सदर गुन्हेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता. तसेच लवकरात लवकर गुन्हा उघडकीच आनन्याची सूचना सुद्धा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी स्था गु शा च्या पोलिसांना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पाथकाने बारकाईने तपास करून हरियाणातील ग्राम उतावल येथून
.कैलास इंदल पाल वय ४३ वर्ष रा. बारीच जिल्हा बैतूल मध्य प्रदेश या आरोपीला अटक करण्यात आली होती.त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कालीराम लक्ष्मण नागले वय ३५ वर्ष रा. चाकोर जिल्हा मध्य प्रदेश यांना सुद्धा मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली त्यांनी गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार सुद्धा दि.१८ मे रोजी जप्त करण्यात आली होती.
सदरची कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सावंत, मोर्शी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे , गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे ,वरुड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौवगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे , संजय शिंदे नितीन चुलपार , राजू मडावी पोलीस अंमलदार रवींद्र बावणे, संतोष मुंदाने , त्रेबक मनोहर बळवंत दाबणे , सुनील महात्मे, सय्यद अजमत, अमोल केंद्रे , निलेश डांगरे, युवराज मनगोटे ,रवींद्र वऱ्हाडे , सागर नाथे, चालक हर्षद घुसे,प्रमोद शिरसाट, राजेश सरकाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
चौकट :- एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांची शीक्षा भोगत असतांना कारागृहात मैत्री झाली होती त्याच मैत्रीच्या माध्यमातून जरूड येथील एटीएम फोडले आहे.
चौकट:-तालुक्यातील जरूड येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यांना अवघ्या आठ दिवसाच्या आत पोलिसांनी अटक केल्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .