राज्य/देश
आज नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दाखल होणार दोन नवीन पाहुणे
नागझिरा व्याघ्र प्रकल्पात होणार दोन नवीन पाहुण्यांचे आगमन
भंडारा / जिल्हा प्रतिनिधी
राजू आगलावे
पर्यटनाला चालना मिळावी आणि मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळता यावा यासाठी जिथे वाघाची संख्या जास्त आहे तेथून त्यांचे ज्या अभयारण्यात वाघांची संख्या कमी आहे तेथे वाघांचे स्थानांतरण करण्याचा निर्णय भारतीय वन्य जीव संस्थेने घेतला असून नागझिरा अभयारण्यात चंद्रपूर जिल्ह्यातून 2 वाघ आणून ते सोडण्यात येणार आहेत.
वण्यजीव मुख्यतः वाघाच्या संख्येत वाढ झाल्याने मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढला आहे. त्यामुळे ज्या अभयारण्यात वाघांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी वाघांना स्थलांतरित करण्याचा निर्णय भारतीय वन्यजीव संस्थेने घेतला आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळता यावा आणि पर्यटनाला चालना मिळावी हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील शिवणी आणि गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथून प्रत्येकी एक वाघ असे ऐकून 2 वाघ नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहेत. सध्या स्थितीत नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ऐकून 12 वाघ असून त्यात 9 नार आणि 3 मादी आहेत .
राज्यात पहिल्यांदाच होत आहे हा प्रयोग – वाघांना स्थलांतरित करण्याचा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच होत असून यात यश मिळाल्यास अन्य ठिकाणी सुद्धा असे प्रयोग राबविले जातील असे वन्यजीव संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जय आणि विरु नंतर ओस पडले होते नागझिरा – येथे जय आणि विरु असतांना त्यांना पाहण्यासाठी पर्यटक प्रचंड गर्दी करीत होते . पण जय विरु यांच्या पलायना नंतर आणि कोका अभयारण्यातील T9 चा विषप्रयोगाने मृत्यू झाल्यानंतर येथे वाघांची संख्या कमी झाली होती . पर्यायाने पर्यटकांची संख्या रोडावली होती.
आज नागझिरा अभयरब्यात सोडण्यात येईल वाघांना – 16 मे रोजी वरील दोन्ही ठिकाणाहून पकडण्यात आलेल्या या वाघांना आज (20) मे रोजी नागझिरा अभयरब्यात सोडण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक बिलाल हबीब यांच्या उपलब्धतेनुसार या दोन्ही वाघांना कॉलर आयडी बसविण्यात येईल आणि त्यावर साकोली नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येईल अशी माहिती नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.