क्राइम

बाळ विक्री करणाऱ्या रॅकेट चा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

Spread the love

बाहुल्या बाहुली प्रमाणे होत होती बाळांची विक्री

उल्हासनगर / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                  एकीकडे देशात मानव तस्करी वर बंदी आहे तर दुसरीकडे उल्हासनगर येथील एका दवाखान्यात बाहुल्या बाहुली प्रमाणे बाळांची खरेदी- विक्री केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या दवाखान्याच्या डॉक्टर स्वतः यात सहभागी असल्याचे चौकशीत समोर आले आहे. बाळाच्या विक्रीतून जी रकम मिळत होती त्यातील अर्धी डॉक्टर ला तर अर्धी बाळाच्या आईवडिलांना मिळत होती. उल्हासनगरच्या कॅम्प तीनमधील कंवरराम चौक परिसरात डॉक्टर चित्रा चैनानी यांचं महालक्ष्मी नर्सिंग होम आहे. याठिकाणी नवजात बालकांची खरेदी विक्री होत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सानिया हिंदुजा आणि सोनू पंजाबी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिसांची मदत घेत एक बनावट ग्राहक तयार केले.

तिला मुलगा हवा असल्याचं डॉक्टर चित्रा चैनानीला सांगितलं. त्यानुसार या डॉक्टरने नाशिकहून आलेल्या एका महिलेचं २२ दिवसांचं बाळ या महिलेला दाखवलं. सात लाख रुपये किंमत सांगितली. हा सौदा केला जात असतानाच पोलिसांनी याठिकाणी धाड टाकली. डॉक्टर चैनानी आणि विक्रीसाठी आणलेल्या बाळाच्या आईला ताब्यात घेतलं. ठाणे क्राईम ब्रँच आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. यानंतर चौकशीत धक्कादायक खुलासे झाले. याठिकाणी ज्यांना बाळ नको आहे आणि ज्यांना बाळाची गरज आहे, अशांची गाठभेट करून दिली जाते. मध्यस्त म्हणून डॉक्टर चैनानी काम करत होती.

तसंच जितक्या लाखात सौदा झाला आहे, त्यापैकी जवळपास अर्धे पैसे डॉक्टरला मिळत होते. मुलाचा आणि मुलीचा रेट वेगवेगळा होता. असे अनेक धक्कादायक खुलासे तिच्या चौकशीतून झाले. या रॅकेटमध्ये महाराष्ट्राबाहेरील सदस्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. त्या दिशेनं सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close