23 मे रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था घाटंजी येथे शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
२३/५/२०२३ रोजी “राजश्री शाहु महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घाटंजी,जि. यवतमाळ येथे घाटंजी,पांढरकवडा,आर्णी या तिन्ही तालुक्यातील विद्यार्थी प्रशिक्षणार्थी करिता करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाकरीता मा. ना. श्री. बाळुभाऊ धानोरकर साहेब, खासदार, मा. ना. डॉ. श्री. संदिप धुर्वे, आमदार श्रीमती याशणी नागराजन (भा. प्र. से) मा श्री गोपाळ देशपांडे, उपजिल्हाधिकारी मा. श्री अजयजी अग्रवाल,उद्योजक, उपस्थित राहणार असुन, प्रा श्री राम पंचभाई यांचे व्यक्तीमत्व विकास व करिअर कौन्सलिंग या विषयावर तर प्रा. डॉ. श्री आशिष देउस्कर यांचे “जागतिक कौशल्याची व्याप्ती आणि रोजगाराची संधी” या विषयावर मार्गदशन सत्र आयोजित केले आहे.या शिबीरास तालुक्यातील सर्व विद्यार्थी प्रशिक्षणार्थीी ईयत्ता १० व १२ वी उत्तीर्ण परीक्षेस बसलेले विद्यार्थी यांनी उपस्थिती राहुन शिबीराचा लाभ घ्यावा असे आव्हाहन श्री राहुल पळवेकर प्राचार्यऔद्योगिक प्रशिक्षण संस्था घाटंजी, जि. यवतमाळ यांनी केले आहे.