भारत सरकारच्या विज्ञान व औद्योगिक अनुसंधान परिषदे मार्फत प्रभाकर सरदार यांचा गुणगौरव
अंजनगाव सुर्जी— तालुक्यातील खिरगव्हाण या छोट्याश्या गावातील प्रभाकर सुगंधराव सरदार हे नवोदय विद्यालय समिती मधे डेप्युटी कमिशनर म्हणुन कार्यरत होते. विशेषतः कोरोना काळामध्ये त्यांनी भारत सरकारच्या जिज्ञासा प्रोग्राम अंतर्गत विशेष कामगिरी बजावली. त्यांच्याकडे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि ओडिसा या तीन राज्यातील नवोदय विद्यालयाचा कार्यभार होता. त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन सी.एस.आय.आर. (भारत सरकारची संशोधन संस्था) तर्फे नुकताच श्री गिरीश गौतम जी विधानसभा अध्यक्ष मध्यप्रदेश सरकार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सन २०१८ ते २२ या काळात भारत सरकारच्या जिज्ञासा प्रोग्राम अंतर्गत मध्यप्रदेश,छत्तीसगड आणि ओरीसा राज्यातील विद्यार्थी व शिक्षकां मध्ये सायंटिफिक टेंपरामेंट इन्र्कीस करण्याकरीता व विविध क्षेञामध्ये विविध प्रयोग करुन नाविण्यपुर्ण माँडेल्स तयार करण्याकरीता प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्यांना
बेस्ट परफार्मन्स अवाँर्ड देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्ष श्री गिरीश गौतमजी, डाँ, ए.के. श्रीवास्तव डायरेक्टर सी एस आय आर, डॉ. सतानंद मिश्रा प्रधान वैज्ञानिक उपस्थित होते. अंजनगाव तालुक्यातील खीरगव्हाण ह्या छोट्याशा गावातील सुपुत्राच्या झालेल्या गुणगौरवामुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे..