सामाजिक

वाचा पोलीस विभागाकडून कुठली घटना दाबण्याचा होत आहे प्रयत्न

Spread the love

जालना / नवप्रहार न्यूज नेटवर्क

              मुलीच्या खून प्रकरणात आरोपींना अटक केल्या जात नसल्याच्या कारणामुळे मुलीच्या बापाने स्वतःला रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्याचा तो बेत हाणून पाडला . पण या प्रकरणात पोलिसांनी साधलेली चुप्पी अनेक चर्चेला कारणीभूत ठरत आहे.

सेवली पोलीस  ठाण्यासमोर सदर घटना घडली आहे. मात्र पोलिसांकडून सदरील घटना दाबण्याचा प्रयन्त केला जात आहे. तालुक्यातील शंभु महादेव गावात पंधरा दिवसांपूर्वी एका विहीरीत तेरा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. ही घटना २६ एप्रिलला घडली होती. या प्रकरणी मयत मुलीचे वडील मच्छिंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध सेवली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंधरा दिवस उलटूनही आरोपींना अटक केली नसल्यामुळे जाधव यांनी रविवारी (७ मे) दुपारी पोलीस ठाण्यासमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची खळबळ जणक घटना घडली.

व्हिडिओ व्‍हायरल झाल्‍याने घटना उजेडात

सदर प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात शुटींग घेतल्याने हा प्रकार समोर आला आहे. परंतु पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी फिर्यादी यांना पकडल्यामुळे मोठा अनर्थ होता होता टळला आहे. दरम्यान ही घटना सेवली पोलिसांनी दाबन्याचा प्रयन्त केल्याचा आरोपही केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ  सोशल मीडियावर  व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close