हटके

IAS आणि IPS घडविणारी दिंव्यांग मुलांची शाळा

Spread the love

बिकानेर ( राजस्थान ) / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                   दिव्यांगता हा आभिशाप मानणारे अनेक लोकं असले तरी त्यावर मात करून ‘ हम भी किसीं से कम नही ‘ हे दाखवून देणाऱ्या लोकं देखील जगाच्या पाठीवर आहेत. आणि अश्या लोकांमुळे कुटुंबाचे आणि गावाचे च नाही तर शाळेचे देखील नाव होते. राजस्थान च्या बिकानेर मध्ये असलेली अंध वसतिगृह उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयातून दरवर्षी एक ना एक IAS किंवा IPS बनतो. आतापर्यंत या विद्यालयातून 80 मुलांनी असे केले आहे.

ही शाळा आहे राजस्थानमधील बिकानेरची, बिकानेरची हे एकमेव शासकीय अंध वसतिगृह उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेत सर्व मुले आंधळी आहेत म्हणजेच डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. या शाळेत दरवर्षी एक ना एक बालक शासकीय सेवेत जातोच.

शाळेचे मुख्याध्यापक अल्ताफ अहमद आणि ज्येष्ठ शिक्षक नवाब यांनी सांगितले की, येथून शिकणारी मुले केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सरकारी नोकरी करत आहेत. ही शाळा 1966 मध्ये सुरू झाली. सध्या या शाळेत 92 मुले शिकत असून ती सर्व अंध आहेत. या सर्व मुलांचे स्वप्न आयएएस असल्याचे त्यानी सांगितलं.

राधेश्याम पुढे म्हणाले की, येथून 1977 मध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर 1982 मध्ये सरकारी नोकरीला सुरुवात केली. आता मी 2018 पासून या शाळेत लेक्चरर म्हणून काम करत आहे.

दृष्टीहीन मुलांना चांगले शिक्षण आणि चांगले वातावरण दिले तर ते शिक्षणात व इतर क्षेत्रात मोलाचे योगदान देऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. आज आपण कोणावरही अवलंबून नसून समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहोत.

या शाळेतून उत्तीर्ण होऊन विद्यार्थी आज चांगल्या पदावर विराजमान आहेत. यामध्ये बँक मॅनेजर, आर्मी, प्राचार्य, लेक्चरर, शिक्षक, रेल्वे, कनिष्ठ लिपिक अशा अनेक विभागात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close