कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थी लाभाच्या प्रतीक्षेत शासनाकडून निधीत दिरंगाई.
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार.
घाटंंजी-गरीब कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला आधार म्हणून कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत मिळणारे अनुदान मागील वर्षी म्हणजे एप्रिल २०२२या महिन्यापासून मिळत नसल्याने शेकडो निराधार लाभापासून वंचित आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना राबविण्यात येतात. राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ६० वयातील कमावत्या प्रमुख महिला- पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आधार म्हणून एकरकमी २० हजार देण्याची योजना आहे.घाटंंजी तालुक्यात जवळपास ८० ते ९० निराधार व्यक्तींचे कुटुंबानी अर्थसाहाय्य मिळण्याकरिता तहसिल कार्यालय घाटंंजी येथे संजय गांधी निराधार विभागात योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत मात्र एप्रिल २०२२ पासून शासनाकडून निधीच उपलब्ध होत नसल्याने निराधार कुटुंब या योजनेपासून वंचित आहेत.तरी लोकप्रतिनिधी चे या कुटुंबाकडे दुर्लक्ष दिसत आहे.अशी ओरड निराधार लाभार्थी करित आहे.तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे केंद्राकडून मिळणारे २०० रुपयेसुद्धा एप्रिलपासून २०२२ पासून लाभार्थ्यांना मिळालेले नाही ८०० रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. शासनाने अनुदान देऊन निराधारांना आधार द्यावा अशी मागणी निराधाराकडून होत आहे.