श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विहीगाव येथे अभ्यास दौरा
अंजनगाव सुर्जी (मनोहर मुरकुटे )
स्थानिक राधाबाई सारडा महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील बीए भाग 1मधील विद्यार्थ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था विषयी माहिती जाणून घेण्यासाठी विहिगाव ग्रामपंचायतीला भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वशिष्ठ चौबे यांच्या सदिच्छासह तर प्रा सुरेंद्र किन्हीकर विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनात हा अभ्यास दौरा पार पडला. यावेळी विहिगाव ग्रामपंचायत सरपंच सौ जयश्री पोटदुखे, उपसरपंच श्री भैय्यासाहेब अभ्यंकर तर सचिव श्री उगले यांनी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाविषयी माहिती सांगितली. यात प्रामुख्याने गावातील प्रमुख समस्या, ग्रामपंचायत तर्फे राबविल्या जाणाऱ्या योजना, ग्रामस्थांचा सहभाग,ग्रामपंचायत मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा, ग्रामपंचायती पुढील आव्हाने, पर्यावरण रक्षणासाठी केले जाणारे प्रयत्न, सामाजिक सलोखा,तंटामुक्त अभियान इत्यादी विषयावर सरपंच यांनी माहिती दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गावातील वाचनालयास भेट दिली. यावेळी श्री अनंत मोहोळ , ग्राम पंचायत सदस्य श्री राजीव अभ्यंकर उपस्थित होते. या अभ्यास गटात बीए भाग एक मधील विद्यार्थिनी कु वैष्णवी ढवळे, श्रुतिका भुस्कट वेदांती पोटदुखे, गायत्री नवले, निकिता थोरात,सानिका पोटदुखे, वैष्णवी रेखाते,साक्षी केदार, प्राजक्ता मोकलकर,वैभवी इचे, आकांक्षा हिरे, वैष्णवी माकोडे, राधिका माटे, सानिका खिरकर वैष्णवी शिंदे इत्यादींचा सहभाग होता.