सामाजिक

नेफडो राजुरा टीम च्या वतीने विविध शासकीय कार्यालयांना वृक्षकुंडी भेट.

Spread the love

बाग तयार करण्याकरिता जागेची केली पाहणी.

राजुरा ( छबिलाल नाईक, प्रतिनिधी )

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, राजुरा तालुका पत्रकार भवन, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा यांना वृक्षकुंडी भेट देण्यात आली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू कुळमेथे, तहसील कार्यालय येथे हरिष गाडे, तहसीलदार, पोलीस स्टेशन येथे योगेश्वर पारधी, पोलीस निरीक्षक, आदर्श शाळेत मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, आदींची उपस्थिती होती. सदर उपक्रम नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलू चव्हाण, राष्ट्रीय कला साहित्य व सांस्कृतिक विभाग नागपूर विभाग अध्यक्षा अल्का सदावर्ते, चंद्रपूर जिल्हा जनसंपर्क अधिकारी नेफडो, दिलीप सदावर्ते यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. यावेळी नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समितीचे नागपूर विभाग अध्यक्ष विलास कुंदोजवार, नेफडो चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संतोष देरकर, चंद्रपूर जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी दिलीप सदावर्ते, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलू चव्हाण, चंद्रपूर जिल्हा महिला उपाध्यक्षा सुनैना तांबेकर, संघटक रवी बुटले, डॉ. अफरोज बेग, वनमाला परसूटकर, मंदा सातपुते, माधुरी कुळकर्णी, संगीता पाचघरे, मोहनदास मेश्राम, श्रीरंग ढोबळे आदींची उपस्थिती होती. प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात मोठया वृक्षकुंड्या भेट म्हणून देण्यात आल्या आहे. तसेच याठिकाणी छोटीशी बाग तयार करण्याकरिता जागेची पाहणी करण्यात आली.

———————————————-
नेफडो राजुरा टीम ला मिळाली बगीछा करिता जागा.
उपजिल्हा रुग्णालय व तहसील कार्यालयाच्या परिसरात एक छोटीशी बाग फुलविन्या करिता या दोन्ही कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या बागेला एक मॉडेल बाग तयार करून या दोन्ही प्रशासकीय इमारतीची शोभा वाढवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे कार्य नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या माध्यमातून घडावे आणी त्याला सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ. लहू कुळमेथे, वैद्यकीय अधीक्षक व तहसीलदार हरीष गाडे यांनी दिले. तर पोलीस स्टेशन ची ईमारत ही निर्मानाधीन असल्यामुळे त्या ईमारतिचे बांधकाम पूर्ण होताच भविष्यात तिथेही छोटीसी बाग तयार करता येईल असे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी म्हणाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close