शाशकीय

आंतर राज्यीय अट्टल घरफोडी गुन्हेगारांना अटक

Spread the love
एकूण १८,६९,१८० /- रू. चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामिण कारवाई
नागपूर / अमित वानखडे
           मागील काही दिवसात नागपूर ग्रामीण हद्दीत वाढलेल्या घरफोडीच्या घटनांना आळा बसावा यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी संबंधित ठाणेदारांसह स्थानिक गुन्हे शाखेला यावर प्रतिबंध लावण्याच्या सूचना निर्गमित केल्या होत्या. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करून आरोपींचा शोध घेणे सुरू केले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी आरोपींना जेरबंद करून लाखो रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण में पथकास मिळालेल्या गोपनिय माहिती व साबिक तपासातून निष्पन्न झाले की, जिल्हयात वाढलेले जास्तीत जास्त घरफोडीचे गुन्हे हे सराईत गुन्हेगार मोहम्मद शहबाज उर्फ घुंगरू मोहम्मद सलीम अन्सारी व मोहम्मद जुबेल उर्फ जाबीर बरकतअली हैदरी यानीच केलेले आहेत. अशी माहिती मिळाल्यावरून त्यांचा शोध सुरू असतांना तो राजस्थान येथे असल्याची माहिती प्राप्त झालो त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या ०२ पथक राजस्थान येथील जिल्हा वारन गाव रामनगर तालुका चिषाबारोड येथे जावुन सापळा रचुन आरोपींना शिफातीने ताब्यात घेतले व गुन्हयाबाबत विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने प्रथम सावनेर येथील एक घरफोडी केल्याचे कबुल केले. त्यावरून त्यांना पोस्टे सावनेर अप.क्र. २१०/२३ कलम ४५४, ३८०, ३४ भादवि अन्वये गुन्हयात अटक केली. त्यांचे जवळुन काही माल त्या गुन्हयातील जप्त केला व सदर गुन्हयात आरोपींना न्यायालयात हजर करून ०५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला. पोलीस कस्टडी मध्ये असतांना आरोपींनी या गुन्हयासोबत इतरही १६ गुन्हयांची कबुली दिली व त्यांनी सदर गुन्हयातील मुद्देमाल सलाउद्दीन वल्द समसुद्दीन पठान वय ३१ वर्षे रा. वार्ड नं. ९, इस्माईलपुरा कामठी याचे माध्यमातुन योगेश दामोधर श्रीरंग वय ३५ वर्षे रा. रामेश्वर डोमने यांचे घरी किरायाने वार्ड क्र. २ येरखेडा कामठी यास विकल्याचे दोन्ही आरोपीतांचा नमुद गुन्हयात अटक करून गुन्हयात कलम ४९१ भादवि वाढवुन त्यांचा सुध्दा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला.
सदर गुन्हयात अटक आरोपी १) मोहम्मद शहबाज उर्फ घुंगरू मोहम्मद सलीम अन्सारी वय ३१ वर्षे रा. कादर झेडा चौक जुनी खलासी लाईन कामठी, (गुन्हयातील मुख्य आरोपी ) २) मोहम्मद जुबेल उर्फ जाबीर बरकतअली हैदरी वय २५ वर्षे रा. आझाद नगर, ड्रेगन पॅलेस च्या मागे नविन कामठी, ३) सलाउद्दीन वल्द समसुद्दीन पठान वय ३१ वर्षे रा. वार्ड नं. ९. इस्माईलपुरा कामठी, ४) योगेश दामोधर श्रीरंग वय ३५ वर्षे रा. रामेश्वर ढोमने यांचे घरी किरायाने वार्ड क्र. २ येरखेडा कामठी यांना ताब्यात घेवुन त्यांना विश्वासात घेवुन त्यामधील मुख्य आरोपी मोहम्मद शहबाज उर्फ घुंगरू मोहम्मद सलीम अन्सारी व मोहम्मद जुबेल उर्फ जाबीर बरकतअली हैदरी यांना सखोल विचारपुस केली असता त्यांनी नागपूर ग्रामीण जिल्हयात खालील नमुद गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोस्टे खापरखेडा – ०१, पारशिवनी ०१, नरखेड – ०३, कुही – ०४, काटोल ०४, सावनेर ०१, मौदा- ०१, बुटीबोरी- ०१. ०१ तसेच वर्धा जिल्हयातील ०३ गुन्हे व मध्यप्रदेश येथील सिवनी जिल्हयातील ०१ गुन्हा अरोली अशा एकुण २१ गुन्हयांची कबुली आरोपीतांकडुन मिळाली असुन एकुण १५ गुन्हयातील नागपूर ग्रामीण जिल्हयातील खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. –
सोन्याच्या दागिण्यांची वितळवून तयार केलेली लगड ३१ तोळे १ ग्रॅम एकुण कि. १७,३८,६८०/- रू., ०१ मोटार सायकल कि. ८०,०००/- रू., ०६ मोबाईल संच कि. २६,०००/- रू. ०१ टॅब १५,०००/- रू. नगदी ९,०००/- रू. सोने मोजण्याचे यंत्र ५००/- रू. व कुलूप तोडण्याचे लोखंडी टॉमी असा एकुण १८,६९,१८०/- रू चा माल जप्त करून पोलीस स्टेशन सावनेर यांचे ताब्यात देण्यात आला.
आरोपींना वरील नमुद गुन्हयांमध्ये अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेवुन उरवरीत मुद्देमाल हस्तगत करण्यात येत
आहे. तसेच अजुनही काही गुन्हे आरोपीतांनी केले असल्यास गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद (भा.पो.से.) नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर, अपर पोलीस अधीक्षक श्री संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे, सहा.पोलीस निरीक्षक अनिल राऊत, राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकुर, पोलीस हवालदार विनोद काळे, इक्बाल शेख, ज्ञानेश्वर राऊत, रोशन काळे, पोलीस नायक विरेंद्र नरड, रोहन डाखोरे, विपीन गायधने, अभिशेख देशमुख, सतिश राठोड, स्वाती हिंडोरिया, चालक अमोल कु. मुकेश शुक्ला यांचे पथकाने केली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close