सामाजिक

उद्या (शनिवार)  धामणगाव शहरात श्री परशुराम जन्मोत्सव व भव्य शोभायात्रा

Spread the love

 

धामणगाव रेल्वे/ प्रतिनिधि

अखिल भारतीय ब्राह्मण सभा शाखा धामणगाव रेल्वे च्या वतीने आज दिनांक २२ एप्रिल शनिवारला श्री परशुराम जन्मोत्सव व भव्य शोभायात्रेचे आयोजन  करण्यात आले आहे
अक्षय तृतीयेला भगवान परशुरामजींच्या जन्मोत्सवानिमित्त धामणगाव शहरात श्री परशुराम जन्मोत्सव समिती तर्फे टिळक चौकातील श्री मारुती देवस्थान येथे सकाळी श्री परशुरामजींच्या मूर्ती चे पूजन व आरती तसेच सायंकाळी ६ वाजता पासून श्री मारुती देवस्थान टिळक चौक येथून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून श्री सर्वेश्वर हनुमान मंदिर,नेहरू पार्क, जुना बस स्टँड धामणगाव रेल्वे येथे महाआरतीचे  व समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
समाज बंधू तसेच परिसरातील बंधू-भगिनींनी भगवान परशुरामजींच्या शोभा यात्रेत व महाआरतीत उपस्थित रहावे असे आवाहन श्री परशुराम जन्मोत्सव समिती, अखिल भारतीय ब्राह्मण सभा धामणगाव रेल्वेच्या वतीने करण्यात आलेले आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close