क्राइम

तिने कुटुंबियांना कळवे पर्यंत भावाचा गेम खल्लास

Spread the love

दिंद्रुड (बीड) / नवप्रहार न्यूज नेटवर्क

             सरपण आणण्यासाठी बहिणी सोबत घराबाहेर पडलेल्या 15 वर्षीय भावाचा मृतदेह झाडाला संशयास्पद रित्या लटकवलेला आढळून आल्याने नातेवाईकांना त्याची हत्या केल्याचा संशय आहे. बहिणीसमोर भावाला चार ते पाच लोकांनी अडवून मारहाण करण्यात सुरवात केली होती. हे सगळे पाहून घाबरलेल्या बहिणीने घराकडे धाव घेतली. नातेवाईक घटनास्थळी आले तेव्हा मुलाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.त्यामुळे नातेवाईकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. घटना माजलगाव तालुक्यातील दिंदृड ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.  गुलाम मोहम्मद हाफिज मुर्तजा शेख असे मृताचे नाव आहे.

नित्रुड येथील गुलाम मोहम्मद हाफिज मुर्तजा शेख हा आपल्या बहिणीसोबत सरपण आणण्यासाठी सकाळी सात वाजता घराबाहेर पडला. दरम्यान, तीन ते चार व्यक्तींनी त्याला रस्त्यात अडवत मारहाण सुरु केली. यामुळे घाबरलेल्या बहिणीने घराकडे धाव घेतली. माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले असता एका झाडाला संशयास्पदरीत्या गळफास घेतलेल्या अवस्थेत गुलाम मोहम्मद हाफिज मुर्तजा शेख याचा मृतदेह आढळला.

दिंद्रुड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. दिंद्रुड पोलीस स्टेशन बाहेर मृताचे नातेवाईकांनी गर्दी केली आहे. आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती असून पुढील तपास सुरु आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close