सामाजिक

मजरा ( लहान) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

Spread the love

ग्यानीवंत गेडाम/वरोरा

वरोरा तालुक्यातील मजरा ( लहान) येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गावभर रॅली काढण्यात आली.ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रामुख्याने सरपंच वंदना निब्रड, उपसरपंच प्रमोद तोडासे, ग्रामपंचायत सदस्य हर्षद निब्रड, सारिका धाबेकर, प्रतिभा मानकर, धनराज वांढरे, मंडळाचे अध्यक्ष रागिनी मानकर, आबाजी रामटेके, ग्यानीवंत गेडाम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळेस सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.रात्रीला स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता गावातील बौद्ध उपासक तथा उपासीका, युवक यांनी विशेष सहकार्य केले.

बाक्स

ग्रामपंचायत कार्यालय मजरा (लहान) तर्फे बाबासाहेबांना अभिवादन.

महामानव क्रांतीसुर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सरपंच वंदना निब्रड यांच्या हस्ते महामानवाच्या फोटोचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने सरपंच वंदना निब्रड, ग्रामसेवक एकनाथ चापले, उपसरपंच प्रमोद तोडासे, ग्रामपंचायत सदस्य हर्षद निवड, राजेंद्र बोढे, प्रतिभा मानकर, अनिता आत्राम, तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सारिका धाबेकर, सामाजिक कार्यकर्ता ग्यानीवंत गेडाम, धनराज वांढरे, सुभाष लढोदिया, ग्रामपंचायत संगणक कर्मचारी रागिनी मानकर, शरद आत्राम उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close