क्राइम

हत्याकांडासोबत पिस्तुलची ही चर्चा

Spread the love

माफिया अतिक अहमद याच्या हत्येत वापरण्यात आलेले पिस्तुल ‘ तुर्की मेड ‘

मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क

              माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर देशात खळबळ माजली आहे. या हत्येसोबतच या हत्याकांडात वापरण्यात आलेल्या पिस्तुलीची देखील जबरदस्त चर्चा आहे. कारण मारेकऱ्यांकडून जप्त पिस्तुल हे ‘ मेड इन तुर्की ‘ आहे. यावर भारतात बंदी आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसावला याच्या हत्येत देखील अश्याच पिस्तुलीचा उपयोग झाला होता असे समजते.

                    काही घटना या अश्या असतात ज्या चिरकाल स्मरणात राहतात. त्यापैकी एक माफिया अतिक आणि अशरफ याचे हत्याकांड. या हत्याकांडाची देशात चर्चा आहे पण सोबत या हत्याकांडात वापरण्यात आलेल्या पिस्तुलीची देखील चर्चा आहे. कारण सर्वात प्रथम या पिस्तुलीवर भारतात बंदी आहे. असे असताना  हे पिस्तूल मारेकऱ्यांपर्यंत कसे पोहोचले? हा संशोधनाचा विषय आहे.

पोलिसांनी तिन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. अतिक आणि अशरफ यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांची ओळख लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य अशी सांगितली जात आहे. तिन्ही दुचाकीस्वार पत्रकारांच्या वेशात आले होते. तिन्ही हल्लेखोर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तिघेही प्रयागराजमधील एका हॉटेलमध्ये ४८ तासांपासून खोली घेऊन थांबले होते.

पोलिस रेकॉर्डनुसार, लवलेश तिवारी बांदा, अरुण मौर्य हमीरपूर आणि सनी कासगंजचा रहिवासी आहे. तिन्ही आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शूटर अरुण याच्यावर आधीच खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरा खुनी सनी याच्यावर 15 खटले सुरू आहेत. लवलेशवर यापूर्वीच गुन्हा दाखल आहे.

हे हल्लेखोर ज्या बाइकवरून आले होते त्याबद्दलही खुलासा झाला असून ही UP70M7337 नंबर बाईक सरदार अब्दुल मन्नान खान या नावावर रजिस्टर केलेली आहे. तर हा नंबर हिरो होंडा सीडी १०० एसएस बाइकवर रजिस्टर आहे. तसेच गाडी तीन जुलै १९९८ रोजी कॅशने खरेदी करण्यात आली होती. ही बाइक कोठून आणली याबद्दल तपास सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या चौकशीत तिघांनीही आपल्याला मोठे माफिया बनायचे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच त्याने ही घटना घडवली. किती दिवस लहान-सहान शुटर बनुन राहाणार असेही त्यांनी सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी सिंग यापूर्वी तुरुंगात गेला असून तुरुंगातच तो भाटी टोळीचा प्रमुख सुंदर भाटीचा खास बनला. त्याच्यावर सुंदर भाटीसाठी काम केल्याचा आरोपही आहे.

मारेकऱ्यांकडे हे पिस्तुल आले कुठून ? 

अतिक आणि अशरफ यांच्या हत्येत जिगाना बनावटीचे पिस्तूल वापरण्यात आले आहे. तुर्कीमध्ये बनवलेले हे पिस्तूल पाच ते सहा लाख रुपयांना मिळते. भारतात यावर बंदी आहे, त्यामुळे इतर देशांतून बेकायदेशीरपणे भारतात आणले जाते. या पिस्तुलमध्ये एकावेळी १७ गोळ्या भरता येतात. एकाच वेळी अनेक गोळ्या झाडल्याचे अतिक अहमदच्या हत्याप्रकरणात दिसून आले. सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये वापरले होते हेही त्याच मॉडेलचे पिस्तूल असल्याचे बोलले जात आहे

ही आहे या पिस्तुल ची खासियत – 

तुर्कीमध्ये बनवलेले जिगाना मेड पिस्तूल मलेशियाचे लष्कर, अझरबैजान आर्मी, फिलिपाइन्स आर्मी देखील वापरतात. तसेच हे पिस्तूल पूर्णपणे ऑटोमॅटीक असून एकाच वेळी अनेक राऊंड फायर करता येतात.

पाकिस्तानमार्गे भारतात बेकायदेशीरपणे त्याचा पुरवठा केला जातो. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानातून भारताला त्याचा पुरवठा केला जातो, असे सांगितले जाते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close