भंडारा बसस्थानकाची चौकशी खिड़की होते आधीच बंद….!!!
प्रवाशांची चौकशीसाठी तारांबळ,
आगार प्रमुखानी लक्ष देण्याची मागणी,
भंडारा प्रतिनिधि
अजय मते
भंडारा जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या भंडारा शहरातील मुख्य बस स्थानकावरील चौकशीची खिडकी वाटेल तेव्हा बंद होत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावे लागते. विशेष म्हणजे रात्री येणाऱ्या प्रवाशांना याठिकाणातून एसटी बसेसची कुठलीच माहिती मिळत नसल्याने मोठी अडचण होते. नियमानुसार चौकशी खिडकी ही शेवटच्या बस पर्यंत उघडी राहायला पाहिजे. मात्र काही दिवसापासून सदर खिडकी रात्री १० च्या आधीच बंद होत असते. असाच काहीच प्रकार दि. १४ एप्रिलच्या रात्रीला दिसून आला. यामुळे १० वाजतानंतर आलेल्या प्रवाशांना बसेसबाबत कुठली माहिती मिळली नसल्याने प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागला. यावेळी उपस्थित प्रवाशांनी प्रचंड रोषही व्यक्त केला. करीता आगार प्रमुखांनी गांभीर्याने लक्ष देऊन सदर प्रकरणाची करण्याची चौकशी दोषीवर कारवाई करण्याची गरज आहे.
जिल्ह्याचे प्रमुख बसस्थानक हे भंडारा शहराच्या मुख्य भागात आहे. सदर बसस्थानकात दिवसभर एसटीच्या बसेस सातत्याने ये-जा करीत असतात. शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध, शिवाई, लालपरी सारख्या बसेसचे दिवसभर आवागमन सुरु असते. या बसेसबाबत माहिती विचारण्यासाठी बसस्थानकाच्या मधोमध चौकशी कक्ष लावण्यात आलेले आहे. या ठिकाणी दोन कर्मचारी आळीपाळीने कर्तव्य बजावत असतात. रात्री कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना शेवटची बस येई पर्यंत चौकशी कक्ष सुरू ठेवावे लागते. यामुळे रात्री येणाऱ्या प्रवाशांना अचूक माहिती मिळाल्याने अडचण होत नाही.
मात्र मागील काही दिवसापासून सदर बस स्थानकातील चौकशी खिडकी दहा वर्षाच्या आधीच बंद होत असल्याचे बोलले जात आहे. दि. १४ एप्रिलला काहीसा प्रकार सदर बसस्थानकावर दिसून आला. यादिवशी जवळपास १० वाजता दरम्यान विविध मार्गावरून अनेक प्रवासी भंडारा बसस्थानकावर आले. पुढच्या प्रवाशाची माहिती विचारण्यासाठी सदर प्रवासी हे चौकशी खिडकीवर गेले. मात्र सदर चौकशी खिडकी बंद असल्याचे दिसून आले. यावेळी दारालाही कुलूप लावण्यात आले होते. यामुळे प्रवाशांना कुठलीच माहिती मिळू शकली नाही. प्रवाशांनी यावेळी प्रचंड रोष व्यक्त केला. काही प्रवासांनी तर सेक्युरिटी गार्डचीच कानउघाडणी केली. मात्र सेक्युरिटी गार्डने प्रवासांची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शेवटी चौकशी खिडकी बंद असल्याने प्रवाशांना शेवटपर्यंत कुठलीच अचूक माहिती मिळू शकली नाही. वयोवृद्ध, महिला, मुले व इतर प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे सदर चौकशी खिडकीवर शेवटच्या बस येईपर्यंत सुरू ठेवण्यात यावी. शिवाय सदर प्रकाराची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासांनी केली आहे.
………………………………………….
चौकशी करणार…!
शेवटच्या बसचा शेड्युल जो पर्यंत आहे तो पर्यंत चौकशी खिडकीमध्ये कर्मचाऱ्यांनी राहायलाच पाहिजे. मिळालेल्या माहिती नुसार चौकशी खिडकीवर कर्मचारी राहत नसतील तर सदर प्रकाराची पुरेपूर चौकशी करणार आहे.
यतीश कटरे
आगार प्रमुख, बस स्थानक भंडारा