थाटामाटात लग्न पण नवरीने त्याच रात्री केले असे की ……..
थाटामाटात लग्न पण नवरीने केले असे की ……..
मेरठ (युपी) / नवप्रहार डेस्क
मुलगी दाखवायची लग्न ठरवायचे. मुलगी गरीब कुटुंबातील असल्याचे सांगून मुलाकडून पैशे घ्यायचे . ठरेलेल्या दिवशी आणि ठिकाणावर मुलीला घेऊन यायचे. लग्न देवळात किंवा ज्या ठिकाणी गर्दी जमणार नाही अश्या ठिकाणी करायचे. लग्न आटोपताच कथित नववधू ही लग्न ठिकाणाहून गायब व्हायची. किंवा सासरी आल्यावर रात्रीतून दागिने आन8 घरातील रोख रक्कम घेऊन पसार व्हायची . असले पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घडतात. पण मेरठ मध्ये देखील असाच प्रकार घडला आहे.”
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले. वाजत गाजत वरात घरी आली. मोठ्या उत्साहात नववधूचे स्वागत झाले. यानंतर दुसऱ्या दिवशी नवविवाहित जोडप्याची हनिमूनची रात्र होती. मात्र नवरीने आपली तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगत टाळाटाळ केली. यानंतर नवरी सासूसोबत झोपायला निघून गेली. रात्री नवऱ्याला झोपेतून जाग आली. तो आईच्या खोलीत आपल्या नवविवाहित पत्नीला पहायला गेला अन् त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची पत्नी घरातून गायब होती. तसेच घरातील दागिने आणि पैसेही गायब होते. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले.
दलालामार्फत लग्न जुळले
मेरठमधील तरुणाचे 40 वय उलटले तरी लग्न जमत नव्हते. यामुळे तरुणासह त्याचे कुटुंबीयही चिंतेत होते. यादरम्यान त्यांना कुणीतरी उत्तराखंडच्या लग्न जमवणाऱ्या एका दलालाबाबत सांगितले. कुटुंबीयांनी त्या दलालाकडे संपर्क साधला. दलालाने उत्तराखंडमधील हल्दानी येथील एका तरुणीचे स्थळ तरुणाला दाखवले. दोन्हीकडची पसंती झाली. मग थाटामाटात लग्न पार पाडले आणि वरात मेरठला आली.
रात्री सर्व झोपल्यानंतर नवरी फरार झाली
सासरच्या घरात नववधूचे जंगी स्वागत करण्यात आले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधूची हनिमूनची रात्र होती. मात्र तरुणीने आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगत हनिमूनला नकार दिला. यानंतर तरुणी सासूच्या खोलीत झोपायला गेली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तरुणाला जाग आली असता तो आईच्या खोलीत आपल्या पत्नीला पहायला आला. मात्र खोलीत पत्नी नव्हती. त्याने घरभर पाहिले तिचा कुठेच पत्ता नव्हता. घरातील दागिने आणि पैसेही गायब होते.
यानंतर आपली फसवणूक झाल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. नवदेवाने तात्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तरुणी एका तरुणासोबत बाईकवरुन पळून जात असल्याचे दिसले. पोलीस तरुणीचा शोध घेत आहेत.