गरलफ्रेंडला मदत करणाऱ्या बॉयफ्रेंड ची ती पोस्ट सध्या होतेय जबरदस्त व्हायरल

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ किंवा पोस्ट व्हायरल होत असतात. त्यात काही गमतीदार काही भयानक तर काही समाजाला शिकवण देणाऱ्या असतात. सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट ने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. चला तर जाणून घेऊ या असे काय आहे यात ……..?
बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड चे नाते वेगळेच असते. यात मस्करी, थट्टा आणि रुसवे फुगवे चालत असतात. पण आम्ही ज्या जोडी बद्दल तुम्हाला सांगणार आहोत त्यांच्या दरम्यान जे घडले ते वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबतच्या संभाषणाचे दोन स्क्रीनशॉट लीक केले आहेत. त्यात प्रेयसीने दोन फोटो पाठवलेले दिसत आहेत. ही दोन्ही फोटो पाहिल्यानंतर आणि मुलीने मुलाला विचारलेला प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर हा स्क्रीनशॉट पाहून लोक खळखळून हसत आहेत.
बहुतेक लोक स्वयंपाक करताना आईची मदत घेतात तशी या मुलीने तिच्या प्रियकराची मदत घेतली. स्वयंपाक करताना जिरे आणि बडीशेप यांच्यातील फरक कळत नसल्यामुळे गोंधळलेल्या मुलीने तिच्या प्रियकराला मदतीसाठी मेसेज केला.प्रेयसीने घेतली प्रियकराची मदत
तिने तिच्या प्रियकराला जिरे आणि बडीशेप दोन्हीचा फोटो पाठवला आणि त्याला विचारले की यातील “जिरे कोणते?” आहे. यानंतर तिच्या प्रियकराने तिला जिरे कोणते आहेत हे सांगितले आणि तिची मदत केली. यानंतर प्रेयसीने त्याचे आभार मानले. तेव्हा त्याने हसणारे इमोजी पाठवून तिची खिल्ली उडवली.
स्क्रीनशॉटला दिले मजेशीर कॅप्शन
सुमित नावाच्या युजरने ट्विटरवर व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. तसेच हे स्क्रीनशॉट पोस्ट करताना त्यांने त्याला एक मजेशीर कॅप्शन देखील दिले आहे. सुमितने ट्वीटमध्ये तीन रडणाऱ्या इमोजीसह लिहिले की, “सॉरी मम्मा, मी चुकीच्या मुलीसोबत अडकलो आहे.” सुमितने कमेंट बॉक्समध्ये “ती माझ्या कुटुंबाच्या सर्व अपेक्षा तोडेल याची खात्री आहे.” असे देखील लिहिले आहे.
नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
बे ट्वीट प्रचंड व्हायरल होत असून 74,000 पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. हे संभाषण वाचून नेटिझन्सने मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “हे चॅट खूप गोड आहे”. दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, “जिरे आणि बडीसोप, ओके होत असतं”. आणखी एकाने लिहिले की, “भाऊ, ती तुझी परीक्षा घेत आहे. नंतर तुलाच हे सर्व करावे लागेल.”