Uncategorized
सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि राज्यात घडत असलेल्या घडामोडी चर्चेत

मुंबई / विशेष प्रतिनिधी
राजयाच्या सत्तासंघर्षाला घेऊन सुप्रीम कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर अंतिम सुनावणी झाली आहे. फक्त निकाल काय तोच बाकी आहे. एकीकडे कोर्टाच्या निकाला कडे सर्वच पक्षाचे लक्ष असतांना राज्यात दिवसागणिक घडणाऱ्या घडामोडी मुळे अनेक चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षा बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राजकीय पक्षांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. सत्तेतून बाहेर पडलेल्या महाविकास आघाडीने राज्यात वज्रमुठ सभा सुरू केल्या आहेत. अश्यातच राष्ट्रवादी च्या भूमिकेमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका मांडली. त्याचवेळी अजित पवारांनी त्यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द केले. एवढच नाही तर अजितदादांनी त्यांचा कॉनव्हॉय आणि स्टाफही सोडला आणि ते खासगी वाहनातून निघून गेले.
अजित पवार नेमके कुठे गेले? अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले का? अशा चर्चा सुरू झालेल्या असतानाच अजित पवार आज सकाळी माध्यमांसमोर आले. आपली तब्येत बरी नसल्यामुळे कार्यक्रम रद्द केल्याचं अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल चर्चा –
एकीकडे महाविकासआघाडीच्या माध्यमातून राज्यभरात वज्रमूठ सभांचं आयोजन करण्यात येत आहे, पण मागच्या काही दिवसांमध्ये फक्त हिडेनबर्ग रिपोर्ट नाही, तर सावरकर मुद्दा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीचा वाद, यावरून राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेतली आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून तर शरद पवारांनी राहुल गांधी यांच्यासमोरच दिल्लीतल्या विरोधकांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे पंतप्रधानांच्या डिग्रीचा वाद सुरू असतानाच अजित पवारांनी मात्र पदवीचा मुद्दा महत्त्वाचा नसल्याची प्रतिक्रिया दिली. 2014 साली जनतेने मोदींना त्यांची पदवी पाहून मतदान केलं नव्हतं, असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही येण्याची शक्यता आहे, तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकासआघाडीमध्ये असतानाही घेतलेल्या या तीन वेगळ्या भूमिका यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धक्कातंत्र पाहायला मिळणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |