क्राइम

युवकाची कोयत्याने वार करून हत्या ; पूर्ववैमनश्यातून घडला प्रकार

Spread the love

पुणे / विशेष प्रतिनिधी

                  खेड तालुक्यातील चांदुस येथील एका 22 वर्षीय युवकावर सहा ते सात लोकांनी कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली होती. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा कयास आहे. मृत युवकाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर वार करण्यात आले होते.शुभम निवृत्ती काळे असे या युवीयचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चांदूस येथील वाळुंज वस्ती येथून शुभम काळे हा दुचाकीवरून जात होता. रस्त्यात त्याला सहा ते सात जणांनी अडवले. जुन्या भांडणाचा राग हल्लेखोरांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी शुभम काही बोलायच्या आत त्याच्या तोंडावर आणि डोक्यावर सपासप वार केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेत शुभम गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. परिसरातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्राव अधिक झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

शुभम काळे याच्यावर हल्ला झाल्याचे समजताच त्याच्या मित्रांनी रुग्णालयात गर्दी केली होती. काहीवेळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खेड पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जमावाला हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत खेड पोलिस ठाण्यात आरोपी संदीप अशोक कल्हाटकर, यशराज विजय वाघमारे, सुरज गोगावले, वैभव कोळेकर, शुभम ऊर्फ सोन्या, चंद्रकांत कारले, करण कारले यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close