राजकिय

चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झोलेल्या अभद्र युतीची जिल्ह्यात चर्चा

Spread the love

  या अभद्र युती मागची खेळी काय?

कॉग्रेस आणि बीजेपी कार्यकर्ते संभ्रमात
 चिमूर ता, प्र, डॉ, ज्ञानेश्वर जुमनाके                             चिमूर —चिमूर तालुक्यात बाजार समिती मध्ये कॉग्रेस चे मातबर नेते सहकार क्षेत्रात नेहमीच वर्चस्व असणारे संजय डोंगरे यांनी चिमूर तालुक्यातील बाजार समिती निवडणुकीत बीजेपी बरोबर केली अभद्र युती अशी जनतेत चरच्या सुरु असून बीजेपी मधल्या निष्ठा वन्त कार्यकर्ते नाराज असल्याची चरच्या चिमूर तालुक्यात रंगत आहे कॉग्रेस पक्षा चे निष्ठावंत म्हणून ओळख असणारे व सहकार क्षेत्रात चाणक्य समजणाल्या जात असणारे संजय डोंगरे यांनी बीजेपी सोबत युती करून चिमूर तालुक्यात नवीनच खेळी केली काय? असा प्रश्न सध्या चिमूर तालुक्यात निर्माण झाला आहे
  बीजेपी च्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नी दबक्या आवाजात या बद्धल नाराजी व्यक्त केली आहे असे सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून कळते. काही बीजेपी चे कार्यकर्ते नाराज असून अपक्ष फॉर्म बाजार समिती मध्ये भरणार आहेत असेही बोलल्या जात आहे. सध्या बीजेपी च्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बोहेरच्या येणाऱ्या कार्यकर्त्यांन वर जास्त विश्वास बीजेपी मध्ये दाखवल्या जात आहेत व नवीन येणाऱ्यानाच बाजार समिती मध्ये उमेदवारी देणार असल्याचे हि बीजेपी च्या कार्यकर्त्यां मध्ये बोलल्या जात आहेत काही बीजेपी च्या कार्यकर्त्यांनी आमदार मोहदय यांच्या जवळ बोलले की अगोदर संजय डोंगरे यांचा बीजेपी पक्षात प्रवेश घ्या मगच त्यांच्या सोबत युती करा तर दुसरी कडे कॉग्रेस पक्षा नी संजय डोंगरे यांच्या सोबत काही दिवसा अगोदर बाजार समिती निवडणुकी बद्धल चरच्या केली असतात आपण एकटेच बाजार समिती निवडणुक लढविणार असल्या चे बोलून दाखवले असे कॉग्रेस कार्यकर्ते दबाल्या आवाजात बोलत आहेत वेळेवर संजय डोंगरे यांनी बीजेपी पक्षा सोबत युती करून कॉग्रेस पक्षा ला तोंडघशी पाडण्याचे काम केले आज बाजार समिती निवडणुकी करीता कॉग्रेस व बीजेपी मधील इच्छुक असणारे कार्यकर्ते यांची  हिरमुसले झाले आहेत असेही जनतेत बोलल्या जात आहे.    तर दुसरी कडे आमदार मोहदयांना आपल्या कार्यकर्त्यांन पेक्षा जास्त प्रेम काँग्रेस कार्यकर्त्यांन वर आहे काय ? असे कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते  बोलत आहेत चिमूर विधानसभा मध्ये कट्टर विरोधक असलेले कॉग्रेस आणि बीजेपी बाजार समिती निवडणुकीत एकत्र कसे काय ? या बद्धल जोरदार चर्चा सुरु आहे सोमवारला 3वाजेपर्यंत उमेदवारी फॉर्म भरायचे असून या युती मुळे कॉग्रेस आणि बीजेपी मध्ये नाराजी नाट्य रंगण्याचे चित्र दिसत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close