केलेले अतिक्रमण स्वतःच हटविले यालाच म्हणतात उशिरा सुचलेले शहाणपण.
मोहाडी. / प्रतिनिधी
तालुक्यातील दीड हजार लोक वस्तीचे छोटेसे निलज (खुर्द) हे गाव या गावात गट क्र.४४ वर काही लोकांनी अतिक्रमण केले विरोध केला परंतु निस्फल ठरला. उपोसन केले तर केलेले अतिक्रमण स्वतःच काढले.
करडी पासून हाकेच्या अंतरावर असलेले निलज (खुर्द) हे गाव या गावातील लोक संख्या दिड हजाराच्या घरात आहे.या गावात ग्राम पंचायत जवळ गट क्र.४४ ची मोकळी जागा आहे.या जागेवर सन २०२० मध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत माती काम करून सपाट केले. व आता मुरूम टाकणार आहेत .
निलज येथील परमात्मा एक सेवक मंडळाच्या लोकांनी गावात वर्गणी करून सेवक संमेलन केले.त्या कार्यक्रमातील लाखाच्या वर निधी शिल्लक राहिली व अती स्थाहन्या लोकांना अतिक्रमण करण्याची युक्ती सुचली व त्यांनी ग्राम पंचायत जवळ असलेल्या गट क्र.४४ वर भवन बांधन्या करिता अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले त्यास गावातील लोकांनी विरोध केला पण अतिक्रमण करते हम्रातुम्रिवर आले. व या सवेदन सिल गावात वातावरण तापू लागले व याची तक्रार उपविभागीय अधिकारी तुमसर.तहसीलदार मोहाडी.पोलीस स्टेशन करडी येथे देण्यात आली त्यांना काम बंद करण्यास सांगून सुद्धा सुटीच्या दिवशी काम करत होते त्या मुळे संतापलेला लोकांनी अतिक्रमण काढण्या साठी दि.२७ मार्च पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली दि.२८ मार्च रोजी तहसीलदार दीपक कारंडे यांनी उपोषण मंडपात येऊन दि.१० एप्रिल पर्यंत अतिक्रमण काढले जाईल असे आश्वासन देत उपोषण सोडन्यास सांगितले व उपोसान सुटले.आता कारंडे बाबाचा बुलडोझर चालणार व आपली नामुष्की होईल हे बघून अतिक्रमण करत्यानी दि.१ एप्रिल पासून स्वतःच केलेले बांधकाम तोडण्यास सुरुवात केली.आरेरावी संपुष्टात आली व निधी पाण्यात गेली.
त्या मुळे अतिक्रमण करताना उशिरा होईना शहाणपण सुचले.
व पेटलेले गाव शांत झाले.