चांगल्या कामासाठी गौरविण्यात आलेली मुन्नीदेवी ACB च्या जाळ्यात
भिवानी ( हरियाणा ) / नवप्रहार डेस्क
चांगल्या आणि प्रामाणिकतेसाठी गौरविण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याला 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी ने रंगेहाथ अटक केली आहे. एक महिलेचे अडकलेले पैसे काढून देण्यासाठी तीने या लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे.
भिवानीमधील बवानीखेडी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
बवानीखेडी पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेची तक्रार होती. या महिलेला एका व्यक्तीकडून पैसे वसूल करायचे होते. यामुळे पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस अधिकारी मुन्नी देवी यांनी या तक्रारदार महिलेकडे 5 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर या महिलेने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने महिला पोलीस अधिकारी मुन्नी देवी यांच्या विरोधात तक्रार दिली.
हरियाणातील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ट्विट करत ही माहिती दिली आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ट्विट करत म्हटले की, ‘काल हिसार उर्फ भवानी येथे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बवानीखेडी पोलीस (Police) स्टेशनमधील महिला पोलीस अधिकारी मुन्नी देवी यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं’.तक्रारदार महिलेच्या तक्रारीनंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुन्नी देवी यांना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानंतर मुन्नी देवी यांना या पथकांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने महिला पोलीस अधिकारी मुन्नी देवी यांच्यावर कारवाई केल्यानंतर तीन तासांनतर हे प्रकरण प्रसारमाध्यमांवर आलं.
‘या महिला पोलीस अधिकारी मुन्नी देवी यांना स्वातंत्र्य दिनाला चांगलं आणि प्रामाणिक कामांसाठी गौरवण्यात आलं होतं, असंही त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. एका युजरने म्हटले आहे की, तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे. देशातील भ्रष्टाचार संपुष्टात आला तर 80 टक्के समस्या नाहीशा होतील’. तर अनेक युजर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाईचे कौतुक करत आहे.